उन्हाचा कडाका अन्‌ पिकांनी टाकल्या माना

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

निलंगा - गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली असून पिके वाळू लागली आहेत. पाऊस पडण्याची आशा धूसर झाल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.

निलंगा - गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली असून पिके वाळू लागली आहेत. पाऊस पडण्याची आशा धूसर झाल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.

यंदा मृग नक्षत्र वेळेवर बरसल्याने शेतकऱ्यांकडून खरिपाची पेरणी करण्यात आली. सर्वाधिक पेरणी सोयाबीन पिकाची करण्यात आली असून पेरणीच्या सुरवातीलाच चांगला पाऊस झाला. त्यानंतर पावसाने उघडीप दिली. अधूनमधून पडलेल्या पावसामुळे पिकाची स्थिती चांगली होती. सध्या पीकही फुलोऱ्यात असून ऐन फळधारणेच्या काळात पाऊस नसल्याने गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. पाऊस पडणारी महत्त्वाचे नक्षत्रही कोरडी जात असून ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची व्यवस्था आहे ते शेतकरी तुषारद्वारे पाणी देत आहेत. सोयाबीन, तूर, उडीद व मूग पाऊसच पडत नसल्याने पिके वाळू लागली आहेत. विंधन बोअरच्या व विहिरींच्या पाणीपातळीतही वाढ होत नाही त्यामुळे ग्रामीण भागात पाणीटंचाईची परस्थिती गंभीर होणार आहे. शेतकऱ्यांकडील जनावराचा चारा संपल्याने पशुधन सांभाळणे अवघड होऊन बसले असून शासनाने याबाबत चारा पुरविण्यासाठी नियोजन करणे आवश्‍यक आहे.

Web Title: nilanga news agriculture