हैदराबाद सोने लूटप्रकरणी नांदेडमध्ये नऊ ताब्यात 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 डिसेंबर 2016

नांदेड - आंध्र प्रदेशातून एका प्रसिद्ध फायनान्स कंपनीवर दरोडा टाकून 50 किलो सोने घेऊन फरारी झालेल्या संशयितांना पकडण्यासाठी आंध्र प्रदेश पोलिसांच्या विशेष पथकाने नांदेड स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने बुधवारी (ता. 28) रात्रभर मुदखेड तालुक्‍यात सर्च ऑपरेशन राबविले. पांगरगाव तांडा येथून नऊजणांना ताब्यात घेतले. यांपैकी काहींना घेऊन हे पथक गुरुवारी (ता. 29) सकाळी हैदराबादला रवाना झाले आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आंध्र प्रदेशातील मेडचल पोलिस ठाण्याच्या हद्दीत पंधरा दिवसांपूर्वी राज्य महामार्गावरील दरोडेखोरांनी पेट्रोलपंप लुटला होता. त्यानंतर दोनच दिवसांपूर्वी हैदराबाद येथील मुथुट फायनान्समध्ये दरोडा टाकून पन्नास किलो सोने घेऊन काही दरोडेखोर फरारी झाले होते. या घटनेनंतर आंध्र प्रदेशात खळबळ उडाली आहे. तेथील सेंट्रल क्राईम स्कॉड (सीसीएस), स्पेशल ऑपरेशन टीम (एटीएस) चे पथक संशियतांच्या शोधासाठी कालपासून नांदेड जिल्ह्यात होते. पोलिस निरीक्षक सत्यनारायण, पोलिस निरीक्षक सतीश रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने येथील पोलिस अधीक्षक संजय येनपुरे यांना माहिती दिली. त्यानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक बनकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड, सहायक पोलिस निरीक्षक विनोद दिघोरे यांच्या मदतीने बुधवारी रात्रभर तपासाची मोहीम राबविण्यात आली. खात्री पटल्यानंतर मुदखेड तालुक्‍यातील पांगरगाव तांडा येथे छापा टाकला. तेथील नऊजणांना संशयावरून ताब्यात घेतले. गुरुवारी (ता. 29) दिवसभर स्थानिक गुन्हे शाखेत त्यांची ओळखपरेड घेण्यात आली. त्यानंतर यांपैकी काहींना घेऊन हे पथक हैदराबादला रवाना झाले. संशयितांचे नातेवाईक दिवसभर पोलिस अधीक्षक कार्यालयात थांबून होते. 

मुदखेडमध्ये खळबळ 
हैदराबादच्या पोलिस पथकांनी पूर्ण रात्र जागून शोधमोहीम राबवली. आज पहाटे तीनच्या सुमारास नऊ संशयितांना ताब्यात घेतल्याने मुदखेड तालुक्‍यात खळबळ उडाली आहे. या कारवाईबाबत नांदेड पोलिसांनी अत्यंत गोपनीयता पाळली होती. 

Web Title: Nine arrested in Hyderabad,