पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेस 90 टक्के उमेदवारांची उपस्थिती

उमेश वाघमारे
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

जालना पोलिस प्रशासनाच्या 50 जागांसाठी नऊ हजार 839 उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज भरले होते. त्यापैकी सहा हजार 901 उमेदवारांची ता. 12 मार्च ते 22 मार्च मैदानी चाचणी परपडली होती.

जालना - जिल्हा पोलिस प्रशासनाच्या वतीने 50 जागांसाठी शुक्रवारी (ता. 6) सकाळी नऊ वाजता पोलिस भरती लेखी परीक्षेस प्रारंभ झाला. विशेष म्हणजे या परीक्षेवर एक ड्रोन कॅमेरा, सीसीटीव्ही आणि व्हिडिओ कॅमेऱ्यांमध्ये रेकॉर्डिंग केली जात आहे.

जालना पोलिस प्रशासनाच्या 50 जागांसाठी नऊ हजार 839 उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज भरले होते. त्यापैकी सहा हजार 901 उमेदवारांची ता. 12 मार्च ते 22 मार्च मैदानी चाचणी परपडली होती. त्यापैकी सहा 226 उमेदवार पात्र ठरले होते. या पात्र उमेदवारांपैकी मैदानी चाचणीच्या गुणाच्या आधारे प्रवर्गनिहाय 15 उमेदवार याप्रमाणे एक हजार 312 उमेदवार लेखी परीक्षेसाठी पत्र ठरले आहेत. या उमेदवारांपैकी जवळपास 90 टक्के उमेदवारांची पोलिस भरती लेखी परीक्षासाठी उपस्थिती आहे. तसेच गैरप्रकार टाळण्यासाठी ड्रोन कॅमेरा, सीसीटीव्ही, व्हिडिओ शूटिंग करण्यात येत आहे. तसेच परीक्षेच्या ठिकाणी पोलिस अधिक्षक रामनाथ पोकळे, अतिरिक्त पोलिस अधिक्षक लता फड यांच्यासह सुमारे 70 अधिकारी 300 कर्मचारी या लेखी परीक्षेत कोणताही गैर प्रकार होणार नाही यासाठी तैनात करण्यात आले आहेत.
 

Web Title: Ninety percent candidate present for police entrance exam in jalna