मुख्यमंत्री सहायता निधीत 98 लाखाची मदत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 ऑगस्ट 2019

फुलंब्री (जि.औरंगाबाद) : फुलंब्री मतदारसंघाचे आमदार तथा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी पुढाकार घेऊन पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून "मुख्यमंत्री सहाय्यता निधी 98 लाख 52 हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिला. तसेच वाढदिवस साजरा न करण्याचेआवाहनही कार्यकर्त्यांना केले.

फुलंब्री (जि.औरंगाबाद) : फुलंब्री मतदारसंघाचे आमदार तथा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी पुढाकार घेऊन पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून "मुख्यमंत्री सहाय्यता निधी 98 लाख 52 हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिला. तसेच वाढदिवस साजरा न करण्याचेआवाहनही कार्यकर्त्यांना केले.

महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा व गडचिरोली, चंद्रपूर या पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. या पूरग्रस्तांना छोटासा मदतीचा हात" म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधी धनादेश 98 लाख 52 हजार रुपये विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी पुढाकार घेऊन स्वतः मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला. या मदतीत औरंगाबाद जिल्हा दूध उत्पादक संघ 25 लक्ष रुपये, छत्रपती राजे संभाजी साखर उद्योग 10 लक्ष 51 हजार रुपये, हरमन फेनोकेम लिमिटेड 51 लक्ष रुपये, औरंगाबाद जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती 11 लक्ष रुपये, हरिभाऊ बागडे यांनी स्वतः 1 लक्ष रुपये, राजू शिंदे 50 हजार रुपये अशी एकूण 98 लाख 52 हजार रुपयांचे धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिला.

यावेळी जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्ष दामू अण्णा नवपुते, कृ.बा.स.सभापती राधाकिसन पठाडे, भाजपा तालुका अध्यक्ष राम बाबा शेळके, सजनराव मते, भाऊराव मूळे, विजय शिरसाठ, जिल्हा दूध संघाचे उपाध्यक्ष नंदलाल काळे, संचालक राजेंद्र जैस्वाल, जिल्हा बॅंकेचे तज्ञ संचालक श्री.नागादकर व आदीची यावेळी उपस्थिती होती.

सांगली व कोल्हापूर येथील पूरग्रस्त परिस्थिती लक्षात घेऊन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे नाना यांनी स्वतः पुढाकार घेऊन आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत 98 लाख 52 हजार रुपये जमा करून मुख्यमंत्री सहायता निधीत सदरील धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देण्यात आला.
- दामू अण्णा नवपुते, उपाध्यक्ष जिल्हा बॅंक औरंगाबाद

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ninty eight lakh aid for chief minister relief fund