परभणीत निघाला निर्भय मॉर्निंग वॉक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

आम्ही सारे दाभोलकर, पानसरे, माणूस संपला तरी त्यांचे विचार मरणार नाहीत अशा घोषणा देत परभणीत सोमवारी (ता. 20) अंधश्रध्दा निर्मुलन समिती व अन्य सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी भर पावसात निर्भय मॉर्निंग वॉक काढण्यात आला.

परभणी- आम्ही सारे दाभोलकर, पानसरे, माणूस संपला तरी त्यांचे विचार मरणार नाहीत अशा घोषणा देत परभणीत सोमवारी (ता. 20) अंधश्रध्दा निर्मुलन समिती व अन्य सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी भर पावसात निर्भय मॉर्निंग वॉक काढण्यात आला.

डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या खुनाला पाच वर्षे तर व कॉ.गोविंद पानसरे यांच्या खुनाला सोमवारी (ता.20) साडेतीन वर्षे पुर्ण होऊन तपास यंत्रणा अपयशी ठरल्याचा आरोप करीत सोमवारी परभणीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या पासुन वसमत रस्त्यावरील राजगोपालचारी उद्यानापर्यंत सकाळी सहा वाजता निर्भय मॉर्निंग वॉक काढण्यात आला. 

त्यानंतर उद्याना समोर सभा घेऊन मॉर्निंग वॉकचा समारोप करण्यात आला. यावेळी, डॉ.रविंद्र मानवतकर, कॉ. किर्तीकुमार बुरांडे, डॉ. शिवाजी दळणर, प्राचार्य डॉ.विठ्ठलराव घुले, कॉ.राजन क्षीरसागर, डॉ. परमेश्वर साळवे, अॅड. लक्ष्मण काळे, नितीन सावंत, डॉ. सुनिल जाधव, रंगनाथ चोपडे, अब्दुल रहिम, लक्ष्मण जोगदंड, मुंजाजी कांबळे यांच्यासह नवरचना प्रतिष्ठानचे विद्यार्थी सहभागी झाले होते, उपस्थित कार्यकर्त्यांनी आपल्या भाषणात सरकारच्या व तपास यंत्रणेच्या भूमिकेवर सडकून टिका केली.

Web Title: Nirbhay Morning Walk in Parbhani