फोटो
फोटो

‘ नकोशी ’ ला मिळाला आधार

नांदेड : बाभूळगाव (ता. नांदेड) परिसरात एका कचराकुंडीत अज्ञात मातेने दोन दिवसाची ‘ नकोशी ’ फेकून देऊन पोबारा केला. मात्र सुज्ज्ञ नागरिकांच्या सतर्कतेने जीवंत असलेल्या या नकोशीवर उपचार करून तब्बल १४ दिवसांनी तिला आधार देत शिशुगृहात दाखल केले. अंगावर शहारे आणणाऱ्या घटनेमुळे समाजातील माणूसकी, नाती संपली की काय असा प्रश्‍न उपस्थित केल्या जात आहे. चाईल्ड लाईनच्या माध्यमातून या ‘ नकोशी ’ ला निवारा भेटला आहे. 

शहरापासून काही अंतरावर असलेल्या बाभूळगाव परिसरात एका कचराकुंडीजवळ बेवारस दोन दिवसाचे स्त्री जातीचे अर्भक रडत असल्याची माहिती नांदेड ग्रामिण पोलिसांना मिळाली. यावरून पोलिस व चाईल्ड लाईच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ता. १३ नोव्हेंबर रोजी दोन दिवसाच्या या अर्भकाला सोबत घेऊन विष्णुपूरी येथील शासकिय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या नकोशीवर अतिदक्षता विभागात तब्बल बारा दिवस उपचार केल्यानंतर हे बालक नांदेड ग्रामिणचे पोलिस एस. व्ही. मुपडे व महिला पोलिस व्ही. एस. गीते यांनी चाईल्ड लाईनच्या विद्या आळणे, आशा सुर्यवंशी, संगिता कांबळे यांच्या सुपुर्त केले. त्यानंतर या महिलांनी त्या नकोशाला सोबत घेऊन बाल कल्याण समितीच्या समोर हजर केले. समिती सदस्य ॲड. गणेशलाल जोशी आणि डॉ. सुरेखा कलंत्री यांच्या समक्ष ही नकोशी गितानगर भागात असलेल्या नरसाबाई महिला मंडळ संचलित शिशुगृह येथे दाखल केले.

नांदेड चाईल्ड लाईन- १०९८ व परिवार सेवाभावी संस्थेचे डॉ. पी. डी. जोशी पाटोदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र समन्वयक बालाजी आलेवार, समुपदेशक आसा सुर्यवंशी, विद्या आळणे आणि संगिता कांबळे यांनी अखेर चौदा दिवसानंतर नकोशीला आधार मिळवून दिला. 

बेवारस लहान मुल आढळल्यास १०९८ वर संपर्क करा

जिल्ह्यात किंवा शहरात बेवारस लहान मुल किंवा स्त्री, पुरुष जातीचे जीवंत अर्भक आढळल्यास नागरिकांनी चाईल्ड लाईन - १०९८ या टोलफ्री क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन चाईल्ड लाईनने केले आहे. अर्भक बेवारस टाकणाऱ्या माता आढळल्यास आमच्याशी किंवा जवळच्या पोलिस ठाण्यात संपर्क साधावा. संबंधीत व्यक्तीचे नाव गोपनिय ठेवण्यात येईल असेही चाईल्ड लाईनच्या विद्या आळणे यांनी सांगितले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com