अखाद्य बर्फाकडे अन्न व औषध आणि पालिकेची डोळेझाक 

वृत्तसंस्था
बुधवार, 9 मे 2018

नांदेड - उन्हाळ्यामुळे अबाल वृध्दांसह सर्वसामान्यांच्या जिवाची काहीली होत आहे. या उष्णतेपासून बचाव करण्यासाठी थंड पेयांची मागणी वाढली आहे. मात्र या थंड पेयासाठी वापरण्यात येणारा बर्फ हा अखाद्या असल्याने तो नांदेडकरांच्या गळी उतरविला जात आहे. या बाबीकडे अन्न व औषध प्रशासन डोळेझाक करीत असल्याचे दिसून येत आहे. 

अन्न व औंध प्रशासन विभागाचे या ठिकाणी सहाय्यक आयुक्त दर्जाचे कार्यालय आहे. परंतु येथील अधिकारी अन्न, फळ, थंड पेय किंवा बर्फ या कारखान्यांवर जाऊन कारवाई करण्यास धजत नाहीत. यामुळे शहरात अखाद्य बर्फाचा वापर करून ते थंड पेयाच्या माध्यमातून नांदेडकरांच्या गळी उतरविण्याचा गोरखधंदा ही मंडळी करीत आहे. 

तसेच शहरात विक्रीसाठी येत असलेल्या व सध्या अंब्याचा हंगाम असल्याने नागरिक आंबा खरेदी करीत आहेत. परंतु, रसायनमिश्रीत पावडरचा वापर करून या आंब्याना रंग देण्यात येत आहेत. परंतु याकडे अन्न विभाग दुर्लक्ष करीत आहेत. उन्हाळा संपत आला तरी या विभागाची एकही कारवाई झाली नसल्याचे दिसून येत आहे. सहाय्यक आयुक्त रमेश जाधव यांनी आमची कारवाई सुरू असल्याचे सांगितले.

Web Title: no action taken against not edible ice