दारूवरून केले वार, १० वर्षे शिक्षा कायम (वाचा सविस्तर)

​ ​​​सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 डिसेंबर 2019

औरंगाबाद : दारू पित असल्याची बदनामी का करता, असा आरोप करीत चाकूने मानेवर व पाठीवर सपासप वार करून तरुणाचा खून करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला जिल्हा न्यायालयाने ठोठावलेली दहा वर्षांची सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती एस. एम. गव्हाणे यांनी कायम केली. अनिल चंद्रय्या सुरकुंडे असे त्या आरोपीचे नाव आहे.

औरंगाबाद : दारू पित असल्याची बदनामी का करता, असा आरोप करीत चाकूने मानेवर व पाठीवर सपासप वार करून तरुणाचा खून करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला जिल्हा न्यायालयाने ठोठावलेली दहा वर्षांची सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती एस. एम. गव्हाणे यांनी कायम केली. अनिल चंद्रय्या सुरकुंडे असे त्या आरोपीचे नाव आहे.

 
या प्रकरणी नाना विश्‍वनाथ चव्हाण (42) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, बेगमपुरा परिसरातील विद्युत कॉलनीत राहणारा राहुल पेरे (22) हा 12 जून 2010 रोजी रात्री कुंभारगल्लीतून पायी जाताना त्याला रस्त्यात अडवून "दारू पित असल्याचे का सांगत फिरतो, माझी बदनामी का करतोस' असे म्हणत मारहाण करण्यात आली होती. राहुल आरडाओरड करु लागल्याने घरात जेवत बसलेले नाना चव्हाण (42) धावत आले. त्यावेळी अनिल चंद्रय्या सुरकुंडे (40, रा. कुंभारगल्ली, बेगमपुरा) हा राहूलवर चाकूने हल्ला करत होता, तर धीरज चंद्रय्या सुरकुंडे, चंद्रय्या सुरकुंडे, राजू ऊर्फ राजेश चंद्रय्या सुरकुंडे हे तिघेजण राहुलला मारहाण करत होते. नाना चव्हाण यांनी मध्यस्थी केली आणि जखमी राहूल पेरे यास उपचारासाठी घाटीत दाखल केले.

हे वाचा तर... जमीन खरेदी - विक्री करताय? आधी हे वाचा.. अन्‌ टाळा आपली फसवणूक

चव्हाण यांच्या तक्रारीवरुन त्या चौघांविरुद्ध बेगमपुरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. खटल्यावेळी, अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील सतीश मुंडवाडकर यांनी 13 साक्षीदारांचे जबाब नोंदवले. यामध्ये वैद्यकीय अहवाल, जखमी राहूल पेरे व घटनेचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व फिर्यादी नाना चव्हाण आणि इतर प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब महत्त्वाचे ठरले होते. दोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरुन न्यायालयाने अनिल चंद्रय्या सुरकुंडे याला दहा वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महिने कारावासाची शिक्षा ठोठावली. त्याविरुद्ध आरोपीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले असता, जिल्हा न्यायालयात सरकारी पक्षाने सादर केलेले वैद्यकीय व परिस्थितीजन्य पुरावे सबळ असल्याचे खंडपीठाचे न्यायमूर्ती एस. एम. गव्हाणे यांनी नमूद केले व जिल्हा न्यायालयाने ठोठावलेली शिक्षा कायम ठेवली.

हेही वाचा-  हिंदू तरुणांवरील गुन्हे मागे घ्या : कोणी केली मागणी?

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No Change Accused Punishment