मराठवाड्यात पीककर्जाची गती वाढेना 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 जून 2018

औरंगाबाद - मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत पीककर्ज वाटपाची गती संथ असून, चार जिल्ह्यांत 25 जूनअखेर फक्त 10.88 टक्‍केच कर्जवाटप झाले. औरंगाबाद, जालना, परभणी व हिंगोली या चार जिल्ह्यांत यंदा खरीप पीककर्ज वाटपासाठी 4,832 कोटी 53 लाख 60 हजार रुपयांचे उद्दिष्ट दिले होते. 25 जूनअखेर चारही जिल्ह्यांतील जिल्हा सहकारी, व्यापारी व ग्रामीण बॅंकांच्या शाखांनी केवळ 10.88 टक्‍केच उद्दिष्टपूर्ती करत केवळ 94 हजार 700 शेतकरी सभासदांना 525 कोटी 83 लाख 36 हजार रुपयांचे कर्जवाटप केले. 

Web Title: no crop loan rate increase in Marathwada