esakal | दुखवट्यासारखा पाळलाय दिवस, प्रशासनाच्या हाकेला अखेर जागले लातूरकर

बोलून बातमी शोधा

No Crowd

‘लॉकडाऊन’ च्या तिसऱ्या टप्प्यात उद्योग-व्यवसाय वेगवेगळ्या अटींवर सुरू करण्याची परवानगी देण्यात आली असली तरी रविवारी मात्र लातूरकरांना ‘शटर डाऊन’ ठेवण्यास प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर आज (ता. १०) सकाळपासून शुकशुकाट पहायला मिळत आहे.

दुखवट्यासारखा पाळलाय दिवस, प्रशासनाच्या हाकेला अखेर जागले लातूरकर
sakal_logo
By
सुशांत सांगवे

लातूर : ‘लॉकडाऊन’ च्या तिसऱ्या टप्प्यात उद्योग-व्यवसाय वेगवेगळ्या अटींवर सुरू करण्याची परवानगी देण्यात आली असली तरी रविवारी मात्र लातूरकरांना ‘शटर डाऊन’ ठेवण्यास प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर आज (ता. १०) सकाळपासून शुकशुकाट पहायला मिळत आहे. औषधांची दुकाने आणि रुग्णालय वगळता शहरातील सर्व व्यवहार बंद असल्याने वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.
मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

‘लॉकडाऊन’च्या तिसऱ्या टप्प्यात राज्य सरकारने ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये काही उद्योग-व्यवसाय सुरू करण्याची परवानगी दिली होती. नागरिकांची गर्दी टाळता यावी म्हणून ठराविक दिवशी ठराविक दुकाने उघडता येतील, असे सांगण्यात आले. या नियमाची अमंलबजावणी गुरुवारपासून (ता.७) शहरात सुरू झाली. याबाबतचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. तरीसुद्धा रस्त्यावरील गर्दी कायम असल्याचेच दिसून येत होते. पण, रविवारी शुकशुकाट दिसून आल्याने हा दिवस त्यास अपवाद ठरला आहे.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

कधी काय आहे सुरु?

ऑटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक वस्तू, टायर्स, बॅटरी, रेडिमेड फर्निचर, मोबाईल शॉपी आदि दुकाने सोमवार आणि मंगळवारी सुरू असणार आहेत. तर कपडे, भांडी, टेलरिंग, फुटवेअर, पत्रावळी, ज्वेलरी, जनरल स्टोअर्स, सुटकेस बॅग या वस्तूची दुकाने बुधवार आणि गुरुवारी सुरू राहतील. शुक्रवार आणि शनिवारी स्टेशनरी, कटलरी, सायकल स्टोअर, स्टील ट्रेडर्स, स्क्रॅप मर्चंट, हार्डवेअर बिल्डिंग मटेरिअल, पेंट ही दुकाने उघडी ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. शेतीसाहित्याची दुकाने, किराणा ही दुकाने रविवार वगळून इतर दिवशी सुरू राहणार आहेत. त्यामुळे रविवारी शहरातील जवळजवळ सर्वच दुकाने बंद असल्याचे दिसून आले.

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा