बीड : मराठा आरक्षण मागणीसाठी आत्महत्या केलेल्या अभिजीत देशमुख याच्या कुटुंबियाला मदतिचे ठोस आश्वासन मिळाल्याशिवाय अंत्यसंस्कार करायचे नाहीत असा पवित्रा विडा (ता. केज) येथील ग्रामस्थांनी घेतला आहे.
व्यापरपेठ बंद ठेऊन ग्रामस्थ प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर एकत्र आले आहेत. गावात शांतता आहे.
अभिजित बालासाहेब देशमुख (वय ३५, रा. विडा, ता. केज) या तरुणाने गळफास लावून मंगळवारी पहाटे आत्महत्या केली. विज्ञानातून पदव्युत्तर पदवी शिक्षण घेतलेला अभिजित देशमुख नोकरी नसल्याने अस्वस्थ होता. त्याच्यासह त्याच्या कुटुंबियांवर बँकेचे कर्जही थकीत होते. त्याच्या खिशात चिट्ठी सापडली असून त्यात मराठा आरक्षण, बँकेचे कर्ज आणि औषधी खर्च या कारणाने आत्महत्या करत असल्याचा उल्लेख आहे.
दरम्यान, अभिजीतच्या कुटुंबियांना शासनाने मदतीचे ठोस आश्वासन दिल्याशिवाय अंत्यसंस्कार आणि मृतदेहाची उत्तरीय तपासणी करायची नाही असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे. बाजार बंद ठुन ग्रामस्थ विडा आरोग्य केंद्रात जमा झाले आहेत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.