उस्मानाबाद जिल्ह्यात लॉकडाऊन नाही, अफवांवर विश्‍वास न ठेवण्याचे आवाहन

1lockdown_12
1lockdown_12

उस्मानाबाद  : जिल्ह्यात सध्या तरी लॉकडाऊनचा कोणताही विचार नसून केवळ अत्यावश्यक सेवांच्या वेळेत बदल केला आहे. नागरिकांना विश्वास घेतल्याशिवाय लॉकडाऊनचा कोणताही निर्णय होणार नसल्याची माहिती जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी`सकाळ`शी बोलताना दिली आहे. याबाबात जाणीवपूर्वक अफवा पसरविल्या जात असून नागरिकांनी त्यावर विश्वास ठेवू नये.

जिल्ह्यातील औषध दुकाने २४ तास सुरू राहणार आहेत, तर अत्यावश्यक सेवा सायंकाळी सातऐवजी पाच वाजेपर्यंत राहणार असल्याचे आदेशही सोमवारी (ता.२१) जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत. जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे लॉकडाऊन होते की काय, असा प्रश्न सामान्यवर्गात चर्चेत येत आहे. काही नागरिक जाणीवपूर्वक खोट्या माहितीची चर्चा करून अफवा पसरवित आहेत.

त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम तयार होत आहे. दरम्यान याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, त्यांनी लॉकडाऊनचा कोणाताही विचार नसल्याचे सांगितले. दरम्यान सध्या रुग्णसंख्या वाढत आहे. नागरिक शारीरिक अंतराचे पालन करीत नाहीत. त्यामुळे संसर्ग वाढत आहे. ही वस्तुस्थिती असली तरी लॉकडाऊन केले जाणार नाही. मात्र नागरिकांनी शारीरिक अंतराचे पालन करावे. जर लॉकडाऊन करायचे असेल तर त्यापूर्वी नागरिकांना सूचना दिल्या जातील. सामान्य नागरिकांना विश्वासात घेतल्याशिवाय लॉकडाऊन केले जाणार नाही. दरम्यान अफवा पसरविणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी सांगितले.

आता वेळेत बदल
जिल्ह्यातील काही औषध दुकाने ही केवळ रात्री नऊ वाजेपर्यंत सुरू होती. दुसरीकडे हॉस्पिटलला संलग्न असलेली दुकाने २४ तास सुरू होती. आता सर्वच औषध दुकाने २४ तास सुरू राहणार आहेत. याशिवाय अत्यावश्यक सेवेतील फळे, भाजीपाला, दूध विक्रीची दुकाने आता सायंकाळी सातऐवजी पाच वाजेपर्यंतच सुरू राहणार आहेत. या वस्तुंच्या खरेदीच्या नावाखाली नागरिक गर्दी करीत असल्याने वेळेत बदल केला असून याचे आदेश दिल्याचेही जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी सांगितले आहे.


संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com