जबाबदार मंत्र्यांचा सत्कार समारंभ; ना मास्क ना फिजिकल डिस्टन्स

दत्ता देशमुख, बीड
Saturday, 2 May 2020

एक केंद्रातील मंत्री आणि एक राज्यातील मंत्री यांच्यासह एक आमदार आणि एक माजी आमदार अशी सर्वच जबाबदार मंडळी एकत्र आली. त्यांच्यात घरगुती स्वरुपाचाच सत्कार सोहळा झाला. परंतु, ना कोणाच्या नाका-तोंडाला मास्क होता, ना फिजिकल डिस्टन्सिंग.

बीड : एक केंद्रातील मंत्री आणि एक राज्यातील मंत्री यांच्यासह एक आमदार आणि एक माजी आमदार अशी सर्वच जबाबदार मंडळी एकत्र आली. त्यांच्यात घरगुती स्वरुपाचाच सत्कार सोहळा झाला. परंतु, ना कोणाच्या नाका-तोंडाला मास्क होता, ना फिजिकल डिस्टन्सिंग. अशा जबाबदार घटकांकडून जर या गंभीर काळात असे प्रकार घडत असतील, तर अशिक्षीत आणि सामान्यांकडून किती अपेक्षा आणि कारवाया करणार असा प्रश्न आहे.

Image may contain: 4 people, people sitting
भोकरदन (जि. जालना) येथे रावसाहेब दानवे यांच्या घरी धनंजय मुंडे, अमरसिंह पंडित

मुख्यमंत्र्यांनी मेडिकल सुरू ठेवले, पण हा पठ्ठ्या काय विकतोय पाहा

कापूस खरेदी केंद्रांची संख्या वाढविणे, कापूस खरेदी वाढवणे, यासह तूर व हरभरा खरेदी केंद्र सुरू करून त्यासाठी ग्रेडर नेमणे आदी मुद्द्यांसाठी शुक्रवारी (ता. एक) राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्रीय ग्राहक संरक्षण व अन्न पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांची भेट घेतली. श्री. मुंडे यांच्यासोबत राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार अमरसिंह पंडित देखील होते. या तिघांमध्ये वरिल मुद्द्यांवर चर्चा झाली आणि दानवेंनी तोडगा काढण्याचे आश्वासनही दिल्याचे सांगीतले जात आहे.

Image may contain: 8 people, people standing and indoor
धनंजय मुंडे यांचा सत्कार करताना रावसाहेब दानवे

परभणीतून फोन आला आणि औरंगाबादेत घडले काय...  

पण, यानंतर दानवेंनी भोकदरनच्या घरी आलेल्या या पाहुण्यांचा सत्कार केला. भलेही राजकीय विरोधी पक्षाचे लोक असले, तरी आलेल्या पाहुण्यांचा सत्कार करण्याची भारतीय संस्कृती आहे. पण, सध्या कोरोना विषाणूची महामारी आणि मास्क व फिजिकल डिस्टन्स असे शब्द परवलीचे आणि नित्य जगण्यातले झाले आहेत. त्यासाठी जनजागृती आणि वेळप्रसंगी कारवाई देखील केली जात आहे.

पण, या दानवे-मुंडे-पंडित यांच्यात झालेल्या बैठकीदरम्यान आणि यानंतर झालेल्या सत्कार सोहळ्यावेळी कोणाच्याही तोंड - नाकाला मास्क नव्हते. फिजिकल डिस्टन्सचीही काही वेगळी अवस्था नव्हती. अशा जबाबदार मंडळींकडूनच जर असे वर्तन होत असेल तर अपेक्षा तरी कोणाकडून करायच्या असा प्रश्न आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No Mask No Physical Distance Raosaheb Danve Dhananjay Munde News