पाण्यासाठी आता "जागते रहो'ची गरज नाही! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 मार्च 2017

औरंगाबाद - शहरातील पाणीपुरवठा सुरळीत व्हावा आणि पाण्यासाठी नागरिकांना रात्री जागण्याची वेळ येऊ नये, यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे महापालिका आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी सांगितले. त्यादृष्टीने जायकवाडीपासून ते शहरापर्यंत जलवाहिनीची आपण स्वत: पाहणी करून सविस्तर माहिती घेणार आहोत. शिवाय रात्री दहा ते पहाटे पाच या वेळात पाणीपुरवठा करणे कसे बंद करता येईल, यासाठी नियोजन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

उन्हाचा तडाखा वाढत असताना पाण्याचा प्रश्‍न गंभीर होत आहे. या महिन्यातच दोन दिवसांचा शटडाऊन घेऊन पाणीपुरवठा विभागाने जलवाहिन्यांच्या गळत्या दुरुस्त केल्या. याला 24 तास होत नाहीत तोच रेल्वेस्टेशन उड्डाणपुलाजवळ होळीपूर्वी मोठी गळती लागली होती. या गळतीच्या दुरुस्तीसाठी पुन्हा साडेआठ तासांचा शटडाऊन घेण्यात आला होता. यानंतर पुन्हा चितेगावजवळ व्हॉल्व्ह फुटला; तर बिडकीनजवळ एका पेट्रोलपंपाजवळ जलवाहिनीला मोठा तडा गेल्याने पाणीपुरवठा विस्कळित झाला. रविवारी (ता. 26) महापौरांना पाण्याच्या टाकीवर धाव घ्यावी लागली. दोन दिवसांपासून निर्माण झालेला पाण्याचा प्रश्‍न अद्याप कायम आहे. या पार्श्‍वभूमीवर सोमवारी (ता. 27) महापालिका आयुक्‍त ओमप्रकाश बकोरिया यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पाणीपुरवठा काही अंशी विस्कळित झाल्याचे त्यांनी मान्य केले. ते म्हणाले, की दोन-तीन ठिकाणी जलवाहिन्यांना मोठ्या गळती होत्या. शिवाय चितेगावजवळ नागरिकांनी जाणीवपूर्वक व्हॉल्व्ह फोडल्याची तक्रार होती. परिणामी, शहरवासीयांना पाणीप्रश्‍न भेडसावत आहे. असे असले, तरी आता मोठा शटडाऊन घेतला जाणार नाही. गुढीपाडव्यानंतर येत्या बुधवारी अथवा गुरुवारी आपण स्वत: जलस्त्रोतापासून शहरापर्यंत संपूर्ण जलवाहिनीची, व्हॉल्व्हची पाहणी करणार आहोत. वॉलमन, लाईनमन, पाण्याच्या वेळा, पाणीपुरवठ्याची क्षमता याची विस्ताराने माहिती घेऊन पाणीपुरवठ्याचे नियोजन करणार आहे. शहरात 100 किलोमीटरची नवीन वितरण व्यवस्था वाढल्याने पाणीपुरवठ्यात अडचणी येत आहेत. 

जालना रोडवरील काही हॉटेल्स; तसेच वॉशिंग सेंटरला आणि शहरातील काही भागांमध्ये 12 ते 24 तास पाणीपुरवठा सुरू असल्याचे निदर्शनास आणल्यावर त्यांनी संबंधितांना याची शहानिशा करून कारवाई करण्याचे आदेश दिले. 

Web Title: No need to stay alert to the water Now