esakal | मराठवाड्यात पावसाचा हाहाकार, पंचनामे नको, आता थेट मदत हवी : माजी मंत्री डॉ. बोंडे 
sakal

बोलून बातमी शोधा

अनिल बोंडे.jpg

उस्मानाबादसह इतर अनेक जिल्ह्यात परतीच्या पावसाने हाहाकार माजविला असून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे पंचनाम्याची गरज नसून शेतकऱ्यांना सरसगट मदत द्यावी, अशी मागणी माजी कृषीमंत्री तथा भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. अनिल बोंडे यांनी व्यक्त केली आहे.

मराठवाड्यात पावसाचा हाहाकार, पंचनामे नको, आता थेट मदत हवी : माजी मंत्री डॉ. बोंडे 

sakal_logo
By
सयाजी शेळके

उस्मानाबाद : उस्मानाबादसह इतर अनेक जिल्ह्यात परतीच्या पावसाने हाहाकार माजविला असून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे पंचनाम्याची गरज नसून शेतकऱ्यांना सरसगट मदत द्यावी, अशी मागणी माजी कृषीमंत्री तथा भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. अनिल बोंडे यांनी व्यक्त केली आहे.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


शहरातील भाजपच्या जिल्हा कार्यालयात गुरुवारी (ता. १५) ते पत्रकारांशी बोलत होते. भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर, जिल्हाध्यक्ष नितीन काळे, माजी जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, ॲड. मिलींद पाटील, जिल्हा उपाध्यक्ष ॲड. नितीन भोसले आदी यावेळी उपस्थित होते. डॉ. बोंडे यांनी यावेळी  जलयुक्त शिवार योजनेची कसलीही चौकशी करा. त्या एसआयटीला खोलीकरणाची कामे दाखवितो, असे म्हणत चौकशी समितीला चांगले आवाहन त्यांनी दिले आहे.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, पुणे जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजविला आहे. नदीकाठच्या गावात पाणी घुसले आहे. शेती-शिवारात पाणीचपाणी झाले आहे. उभी पिके वाहून गेली आहेत. सोयाबीनच्या गंजीही पुरात वाहून गेल्या आहेत. सध्या पंचनाम्याचे सत्र सुरू झाले आहे.  वास्तविक पंचनाम्याची गरज नाही. सरसगट सर्वांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सरसगट मदत करावी, अशी मागणी बोंडे यांनी यावेळी बोलून दाखविली आहे. केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या हिताचे कायदे केले आहेत. मात्र राज्य शासनाने याकडे दुर्लक्ष करून मोठी चूक करीत आहेत. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेण्याच्या ऐवजी केवळ विरोधाला विरोध म्हणून या कायद्यांना विरोध करीत आहेत. त्यामुळे राज्यातील शेतकरी सरकारला माफ करणार नाही, असेही बोंडे यावेळी म्हणाले.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

एसआयटीला घाबरत नाही
जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीला घाबरत नाही. योजनेचा फायदा शेतकऱ्यांना झाला आहे. नदी खोलीकरणाची कामे झालेली आहे. परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरीचे पाणी वाढले आहे. त्यामुळे एसआयटीला मी स्वतः या योजनेचा परिणाम दाखविणार आहे. मी एसआयटीसोबत संपूर्ण महाराष्ट्रात फिरायला तयार असल्याचे सांगत अशा चौकशीला घाबरत नसल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

(संपादन-प्रताप अवचार)