मराठवाड्यावर वक्रदृष्टी; अजूनही तुरळक वृष्टी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 जुलै 2018

औरंगाबाद - मुंबई, कोकण, विदर्भ, पश्‍चिम महाराष्ट्रात धुवाधार कोसळत असला तरी मराठवाड्यावर पावसाची वक्रदृष्टीच आहे. रिमझिम ते मध्यम स्वरूपाच्या सरींव्यतिरिक्त कुठेही दमदार पाऊस झालेला नाही. या पावसाने पेरलेल्या क्षेत्राला थोडाफार आधार मिळाला. शंभर टक्के पेरणीसाठी सर्वदूर, चांगल्या पावसाची व त्याच्या सातत्याची प्रतीक्षा आहे.

औरंगाबाद शहरात दुपारी व सायंकाळी रिमझिम झाली. पंधरा दिवसांच्या खंडानंतर लातूर जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. देवणी शहर व तालुक्‍यातील वलांडी, जवळगा, टाकळी, दवणहिप्परगा, बोरोळ तसेच शिरूर अनंतपाळ तालुक्‍यातही पाऊस झाला. बीड शहरासह गेवराई, माजलगाव, धारूर, केज, शिरूर तालुक्‍यांच्या काही भागांत मध्यम स्वरूपाचा तर उस्मानाबाद शहर व जिल्ह्यातील काही भागांत केवळ रिमझिम झाली. जालना जिल्ह्याच्या काही भागांतही हलका ते मध्यम पाऊस झाला. नांदेडमधील किनवट, माहूर, हदगाव, हिमायतनगर, उमरी व भोकर तालुक्‍यांत काल रात्री बऱ्यापैकी पाऊस झाला. आज मात्र अनेक भागांत तुरळक सरी कोसळल्या. परभणी जिल्ह्यातील गंगाखेडचा अपवाद वगळता अन्य तालुके कोरडेच होते. हिंगोली, कळमनुरी, औंढा, सेनगाव, वसमत तालुक्‍यांत अधूनमधून सरी कोसळल्या.

Web Title: no rain in marathwada