पावसाची दडी, 36 हजार हेक्टवरील पिके धोक्यात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 जून 2018

परभणी : पावसाने पाठ फिरवल्याने परभणी जिल्ह्यातील पेरण्या रखडल्याने त्याचा परिणाम म्हणून बाजारात 19 हजार 741 क्विंटल बियाणे शिल्लक राहीले आहे.त्यात निव्वळ  कापसाची साडे तीन लाख पाकीटे विक्रीअभावी दुकानात पडुन आहेत.दरम्याण आतापर्यंत पेरणी झालेल्या 36 हजार हेक्टवरील पिके धोक्यात आली आहेत.

यंदाच्या खरिप हंगामात सुरुवातीला एक ते दहा जून पर्यंत जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली.त्यात ता.10 जूनच्या रात्री सर्वत्र दमदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या सुरु केल्या होत्या.मात्र लगेच पावसाने दडी मारली.परंतु आज ना उद्या पाऊस येईल या आशेवर बहुतांष शेतकऱ्यांनी पेरण्या सुरु ठेवल्या.त्या दोन ते तीन दिवसात तब्बल 36 हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी 

झाली आहे.पुढे मात्र पावसाची कोणतीही चिन्हे दिसत नसल्याने पेरण्या थांबवण्यात आल्या.जिल्ह्याचे खरिपाचे प्रस्तावीत क्षेत्र 5 लाख 21 हजार 870  हेक्टर आहे.सध्या केवळ 6.93 टक्केच पेरणी झाली आहे.त्यामुळे अजनुही 94 टक्के क्षेत्रावर पेरणी रखडली आहे.पाऊस नसल्याने शेतकऱ्यांनी बियाणे,खताची खरेदी थांबवली आहे.बाजारात कापसाची 7 लाख 62 हजार 

912 पाकीटे उपलब्ध झाली होती.त्यातील केवळ चार लाख पाकीटांची विक्री झाली आहे अजुनही साडेतीन लाख पाकीटे शिल्लक आहेत. सोयाबीनचे 17 हजार 504 क्विंटल बियाणे शिल्लक असून  21 हजार 294 मेट्रीक टन खत दुकानात पडुन आहे.

Web Title: no rain in parbhani crops on 36 hector is in danger