कंत्राटी कर्मचाऱ्यांचे थकले पाच महिन्यांचे वेतन

औरंगाबाद ः पाच महिन्यांपासून थकीत असलेले वेतन मिळावे, या मागणीसाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी महापालिकेच्या अग्निशमन विभागात मंगळवारी आंदोलन केले.
औरंगाबाद ः पाच महिन्यांपासून थकीत असलेले वेतन मिळावे, या मागणीसाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी महापालिकेच्या अग्निशमन विभागात मंगळवारी आंदोलन केले.

औरंगाबाद - महापालिकेच्या अग्निशमन विभागात कंत्राटी पद्धतीने सुमारे 70 कर्मचारी काम करतात. मात्र त्यांचे पाच महिन्यांचे वेतन थकीत असून, दिवाळी सणाच्या तोंडावर तरी थकीत वेतन मिळावे, या मागणीसाठी मंगळवारी (ता.22) या कर्मचाऱ्यांनी काही काळ काम बंद आंदोलन केले. तीन दिवसांत वेतन देण्याचे आश्‍वासन मिळताच कर्मचारी
कामावर आल्याचे सूत्रांनी सांगितले. 

शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असताना महापालिकेच्या अग्निशमन विभागात बोटावर मोजण्याएवढेच अधिकारी, कर्मचारी आहेत. त्यामुळे काही वर्षांपासून हा विभाग कंत्राटी कर्मचाऱ्यांवरच सुरू आहे. महाराणा सिक्‍युरिटी एजन्सीमार्फत या विभागात कंत्राटी पद्धतीने कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली आहे. फायरमन, ऑपरेटर, वाहनचालक अशा पदांवर 70 जण सध्या काम करत आहेत.

या कर्मचाऱ्यांचे पाच महिन्यांपासून एजन्सीने वेतन दिलेले नाही. दिवाळीचा सण अवघ्या दोन दिवसांवर आलेला असतानाही वेतनास टाळाटाळ केली जात असल्यामुळे या कर्मचाऱ्यांनी एकत्र येत अग्निशमनाच्या मुख्य कार्यालयात दुपारी दोनपासून कामबंद आंदोलन सुरू केले. माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे प्रमुख राजू सुरे यांनी कर्मचाऱ्यांची भेट घेत समजूत घातली. दरम्यान एजन्सीतर्फे दोन-तीन दिवसांत वेतन देण्याचे आश्‍वासन मिळाल्यानंतर हे कर्मचारी कामावर परतले, असे श्री. सुरे यांनी सांगितले. 
  
पीएफ, ईएसआयसीच्या रकमेची चौकशी करा 
दरम्यान, कर्मचाऱ्यांनी आयुक्तांना निवेदन दिले असून, त्यात वेतन थकल्यामुळे आमच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. दोन वर्षांपासूनच्या पीएफ व ईएसआयसीच्या रकमेबाबतही कर्मचाऱ्यांनी शंका व्यक्त करत चौकशी करण्याची मागणी केली आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com