औशात सोशल डिस्टन्सिंगसह संचारबंदीचा फज्जा, बँकेसमोर गर्दी अन् रस्ते माणसांनी भरले

Bank Of India, Ausa News
Bank Of India, Ausa News

औसा (जि.लातूर) : टाळेबंदी आणि संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर लोकांनी घरात राहणे अपेक्षित आहे. कोरोनाच्या उपाययोजनेत प्रशासन आणि सरकारला सहकार्य करणे उचित असतांना औसा शहरात कुठेही संचारबंदी आणि सोशल डिस्टन्सिंग असल्याचे पाहावयास मिळत नसल्याचे चित्र दिसत आहे. येथील बँक ऑफ इंडिया समोर सलग दुसऱ्या दिवशीही लोकांनी केली होती. प्रशासनाच्या आवाहनाला नागरिक केराची टोपली दाखवीत असल्याने पोलीस यंत्रणाही आता वैतागली आहे. केंद्र सरकारने दोन दिवसांपूर्वी जनधन खात्यावर पैसे वर्ग करून टाळेबंदीच्या काळात लोकांना मदतीचा हात देऊन त्यांच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र यामुळे झाले उलटेच लोकांनी संचारबंदीच्या काळात घरात बसून या कोरोना विरोधात चाललेल्या लढाईत सहकार्य करायला हवे होते. मात्र पैसे काढण्याच्या निमित्ताने अनेक लोक बँकेत गर्दी करतांना दिसत असल्याने सोशल डिस्टन्सिंग आणि कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्याच्या मार्गालाच यामुळे खीळ बसली आहे.

साठ वर्षांवरील लोकांची गर्दी
यामध्ये सर्वात चिंताजनक गोष्ट ही आहे की, पैसे काढण्यासाठी सर्वात जास्त साठ वर्षाच्या वरील लोकांची गर्दी दिसून येत आहे. या वयात रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्याने रोगाचा सर्वाधिक धोका या वयोगटातील लोकांना असतो. मात्र कोणतीही सावधगिरी या लोकांकडून पाळली जात नसल्याने या गर्दीला रोखण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे उभे टाकले आहे.

वाचा ः शेतकऱ्याने फिरविला फुलशेतीवर नांगर 

ग्राहकसेवा केंद्रे बंद असल्याने मुख्य बँकेत गर्दी
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एस बी आई बँकेची ग्राहक केंद्रावर फिंगरप्रिंट बंद करण्यात आल्याने हजार, पाचशे रुपये काढण्यासाठी मुख्य बँकेत गर्दी होत आहे.

बँकेकडून सुविधा
बँकेकडून गर्दी कमी करण्यासाठी ग्राहकांना गर्दी न करता दूर पंचायतीच्या प्रांगणात आणि बसस्थानकात बसविले जात आहे. त्यांच्याकडून पासबुक व स्लीपवर सही घेऊन जागेवर पैसे दिले जात आहेत. तरीही लोक गर्दी करीत असल्याने बँक व्यवस्थापनही हैराण आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com