लक्षणे नाहीत होम क्वारंटाईन करा; हायरिस्क रुग्णांना चांगले उपचार द्या : पालकमंत्री गडाख 

gadakh 11.jpg
gadakh 11.jpg

उस्मानाबाद : जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता मृत्यूदर कमी करण्यासाठी, लक्षणे नसलेल्या परंतु बाधीत झालेल्या रुग्णांना घरीच क्वारंटाईन राहण्याचा पर्याय उपलब्ध असणार आहे. त्यामुळे आरोग्य विभागावरील ताण कमी होऊन जे रुग्ण हायरिस्कमध्ये आहेत, त्यांच्यावर चांगल्या पद्धतीने उपचार करून त्यांचा जीव वाचविण्याचा प्रयत्न करावेत, अशा सुचना आरोग्य आणि महसूल विभागाला दिल्या असल्याची माहिती पालकमंत्री तथा राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी दिली आहे. 

जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी (ता. ३१) झालेल्या बैठक झाली. यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता कांबळे, जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंढे, आमदार सुजितसिंह ठाकूर, आमदार कैलास घाटगे-पाटील, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. राजाभाऊ गलांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हनुमंत वडगावे आदी यावेळी उपस्थित होते.  

पालकमंत्री गडाख यांनी शुक्रवारी आरोग्य यंत्रणेसह सर्व विभागाचे अधिकारी यांच्यासोबत कोव्हीड-१९ संदर्भात बैठक घेतली. यावेळी बाधीत रुग्णांचा मृत्यूदर कमी करण्याच्या संदर्भात चर्चा झाली. अपुरे मनुष्यबळ आणि यंत्रणा याचा आढावा घेण्यात आला. सध्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दररोज १०० ते १५० संखेने रुग्णसंख्या वाढत आहे.

त्यामुळे यंत्रणेवर ताण येत आहे. सध्या परिस्थितीत यंत्रणा आहे, पण डॉक्टर्स नाहीत. काही ठिकाणी क्वारंटाईन सेंटर आहे, पण कर्मचारी वर्ग नाही. त्यामुळे रुग्णांचे तसेच क्वारंटाईनमधील संशयीतांचे हाल होतात. अशा परिस्थितीत वरिष्ठ स्तरावरून गाईडलाईन वापरण्याची सुचना झाली. त्यामुळे ज्यांच्या घरी क्वारंटाईनमध्ये राहण्याची सुविधा आहे.

अशा संशयीतांना घरीच राहण्याची परवानगी देण्यात आली. तर शारिरीकदृष्ट्या तंदुरुस्त असलेल्या तसेच लक्षणे नसलेल्या बाधीत रुग्णांनाही, त्यांच्या इच्छेप्रमाणे घरी राहता येणार आहे. मात्र त्यांना स्वतःला क्वारंटाईन करूनच राहावे लागेल. असेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्यात दोन दिवसात १० हजार अँटीजन टेस्टकीट मिळतील असा विश्वास यावेळी पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.

वॉररुम तयार करा
जे संशयीत आहेत, मात्र ते घराबाहेर फिरतात. तसेच हे बाधीत आहेत, असे जर घराबाहेर फिरताना दिसून आले तर अशा सर्वांवर सामान्य नागरिकांची नजर असणार आहे. जर असा काही प्रकार घडला तर सामान्य नागरिकांकडून वॉर रुमला फोनद्वारे माहिती दिली जावू शकते. त्यानंतर प्रशासनातील जबाबदार व्यक्ती याची खातरजमा करून संबंधीतावर गुन्हे दाखल होऊ शकतात. त्यासाठी वॉररुम तयार करण्याच्या सुचना पालकमंत्र्यांनी बैठकीत दिल्या.

रिक्तपदे आठ दिवसात भरा
आरोग्य विभगातील कर्मचारी वर्गाची रिक्तपदे भरण्याच्या संदर्भात जिल्हा शल्यचिकीत्सकांनी माहिती दिली. मात्र त्यांच्या पद्धतीवर पालकमंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आरोग्यमंत्र्यांनी रिक्तपदे तात्काळ भरण्याच्यासंदर्भात सुचना केल्या होत्या. तरीही आरोग्य विभाग दक्ष नसल्याचा आरोप लोकप्रतिनिधींनी केल्यानंतर पालकमंत्र्यांनी ही सर्व रिक्त पदे आठ दिवसात भरा, तसा अहवाल मला द्या, असा सक्त सुचना पालकमंत्र्यांनी जिल्हा शल्यचिकीत्सकांना दिल्या.

प्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..!  
सह्याद्री आणि निरामय ताब्यात घेणार
शहरातील खासगी असलेले सह्याद्री आणि निरामय हॉस्पिटल ताब्यात घेऊन तेथे रुग्णांना उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी बैठकीत दिले. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाईचे आदेश देणार असल्याचे सांगितले. आयएमएच्या माध्यमातून या दोन्ही ठिकाणी रुग्णांना सुविधा दिली जाणार आहे.

Edited By Pratap Awachar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com