व्हेंटिलेटरअभावी अनेकांना गमवावा लागतो जीव, जळकोटच्या रुग्णालयातील स्थिती

Jalkot Rural Hospital, Jalkot News
Jalkot Rural Hospital, Jalkot News

जळकोट (जि.लातूर) ः येथील ग्रामीण रुग्णालयात व्हेंटिलेटर नाही. त्यामुळे गंभीर रुग्णांना ऑक्सिजन देता येत नाही. माळहिप्परगा (ता.जळकोट) येथील त्या दोन मजुरांचा जीव वाचला असता; पण ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन मिळाले नाही. तातडीने ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजनची सोय करावी अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.


वांजरवाडा (ता.जळकोट) येथे चार मजूर आडात गुदमरून पडले होते. यातील दोन मजुरांचा जळकोटच्या ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजनची सोय नसल्यामुळे लातूर येथील शासकीय रुग्णालयात नेण्यासाठी वेळ लागला त्यामुळे प्रकृती खालवली. यात त्यांचा मृत्यू झाला. लातूर -मुखेड, उदगीर-जळकोट महामार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात होतात. गंभीर रुग्णांना लातूर, नांदेड, उदगीर आदी ठिकाणी ऑक्सिजनसाठी घेऊ जावे लागते. ही सर्व शहरे चाळीस किलोमीटर अंतरावर आहेत. त्यामुळे गंभीर रुग्ण वाटेतच मृत्युमुखी पडतात. जळकोटच्या ग्रामीण रुग्णालयात व्हेंटलेटरची सोय झाल्यास अनेक रुग्णाचे प्राण वाचणार आहे. आरोग्य विभागाकडून तत्काळ ऑक्सिजनची सोय करावी अशी मागणी तालुक्यातील नागरिकांनी केली आहे.

आत्मक्लेश आंदोलनाने वेधले शासनाचे लक्ष, लातूर जुक्टाच्या सदस्यांचा सहभाग

राज्यमंत्र्यांनी लक्ष देण्याची गरज
जळकोट तालुका हा दुर्लक्षित भाग आहे. सामान्य माणसाला येथील ग्रामीण रुग्णालय एक मोठा आधार वाटत असतो; तसेच डोंगरी तालुका म्हणून जळकोटची ओळख आहे. खूप वर्षांनंतर जळकोटला पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या रूपाने मंत्रिपद मिळाले आहे. त्यांनी ग्रामीण रुग्णालयात व्हेंटिलेटरची व्यवस्था होण्यासाठी प्रयत्न केल्यास ती सहज होऊ शकते. तालुक्यातून दोन महामार्ग जातात. त्यावर नेहमी अपघात होत असतात. अपघातातील जखमींना रुग्णालयात ऑक्सिजन मिळत नसल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.


ग्रामीण रुण्यालयात व्हेंटिलेटरची सुविधा नसून उदगीरसारख्या मोठ्या रुग्णालयात ही सुविधा उपलब्ध आहे. आपल्या ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजनचे सिलिंडर उपलब्ध असतात. व्हेंटिलेटरच्या सुविधेसाठी मशिनरी वेगळे डॉक्टर लागतात. हे आपल्याकडे उपलब्ध नाहीत.
- डॉ.जगदीश सूर्यवंशी, वैज्ञकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, जळकोट


माळहिप्परगा येथील त्या दोन मजुरांना वेळेवर ऑक्सिजन मिळाले असते, तर ते रुग्ण वाचले असते. तालुक्याच्या ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजनची सोय करणे अत्यंत गरजेचे आहे.
- डॉ.अनिल कांबळे, भाजप ज्येष्ठ नेते.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com