नगरसेवकांचा स्थायी समिती सभापती गजानन बारवाल यांच्या दालनात धुडगूस 

मधुकर कांबळे
गुरुवार, 26 एप्रिल 2018

अपक्ष नगरसेवकांनी मोट बांधून भाजप पुरस्कृत गजानन बारवाल यांनी 2 वर्षांपूर्वी स्थायी समितीमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी नगरसेवक कैलास गायकवाड यांना गजानन बारवाल यांच्यासाठी एकवर्षात स्थायी समिती सदस्यत्व पदाचा राजीनामा द्यायला लावला होता.

औरंगाबाद - स्थायी समिती सदस्यपदाच्या निवडीसाठी दोन वर्षांपूर्वी ज्या नगरसेवकांनी पदाचा राजीनामा दिला होता, त्या नगरसेवकांवर अन्याय झाल्यामुळे नगरसेवक कैलास गायकवाड यांच्यासह अपक्ष नगरसेवकांनी गटनेते गजानन बारवाल यांच्या दालनात धुडगूस घालून संताप व्यक्त केला. गटनेते बारवाल यांना अर्वाच्य शब्द प्रयोग करून धिक्कार केला गेला. 

अपक्ष नगरसेवकांनी मोट बांधून भाजप पुरस्कृत गजानन बारवाल यांनी 2 वर्षांपूर्वी स्थायी समितीमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी नगरसेवक कैलास गायकवाड यांना गजानन बारवाल यांच्यासाठी एकवर्षात स्थायी समिती सदस्यत्व पदाचा राजीनामा द्यायला लावला होता. त्यावेळी त्यांनी पुढच्या वेळी संधी दिली जाईल असे आश्वासन नगरसेवक कैलास गायकवाड यांना दिले होते, मात्र गजानन बारवाल यांचा दोन वर्षाचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतरही दिलेल्या शब्दाला न जागता आघाडीच्यावतीने दुसऱ्यांदा स्वतःचे नाव दिले. यामुळे नाराज असलेले कैलास गायकवाड, राहुल सोनवणे, गोकुळसिंग मलके, बाळासाहेब सानप यांनी स्थायी समिती सभापतींच्या दालनात गोंधळ घातला. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Non party corporators expressed foul language in the room of Gajanan Barwala