अनारक्षित प्रवाशांसाठी तिकीट मोबाईल अॅप यु.टी.एस. 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जुलै 2019

नांदेड : अनारक्षित प्रवासी सुविधेत वाढ करण्याकरिता भारतीय रेल्वेने अनारक्षित तिकीट अॅप यु. टी. एस. सुरु केले आहे. या मोबाईल अॅपचे विविध फायदे असूनही याचा अपेक्षित वापर अनारक्षित प्रवासी करत नाहीत. यामुळे या मोबाईल अॅपचा वापर वाढावा आणि प्रवासी सुविधेत वाढ व्हावी म्हणून नांदेड रेल्वे विभाग, दक्षिण मध्य रेल्वेने या अॅपचा प्रचार आणि प्रसार मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत शुक्रवारी (ता. 19) नांदेड रेल्वे विभागातील महत्वाच्या 10 रेल्वे स्थानकावर या यु.टी.एस. अॅपची माहिती देणारे मदत केंद्र सुरु केले आहेत. तसेच कोलेज, शाळा, महत्वाची ठिकाणावर ही या अॅप चा प्रचार आणि प्रसार करण्यात येणार आहे.

वरिष्ठ वाणिज्य विभागीय रेल्वे व्यवस्थापक दिवाकर बाबू यांनी प्रवाशांना आवाहन केले आहे, की भारतीय रेल्वेने प्रवाश्यांचा वेळ आणि श्रम वाचावा म्हणून हे मोबाईल अॅप सुरु केले आहे त्याचा त्यांनी पुरेपूर वापर करावा. अनारक्षित तिकीट तसेच प्लातफोर्म तिकीट काढण्या करिता गर्दी करण्या ऐवजी हे मोबाईल तिकीट अॅप वापरावे.

नांदेड रेल्वे विभागात या युटीएस मोबाईल अॅपचा वापर करून या वर्षी एप्रिल ते जून या तीन महिन्या मध्ये 1.08 लाख प्रवाश्यांनी तिकीट काढले. यातून नांदेड रेल्वे विभागास 18.69 लाख रुपये उत्पन्न भेटले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: non reserved passengers can use UTS app