अपघातातील मृताची ओळख पटेना

अपघात
अपघात

चित्तेपिंपळगाव (जि.औरंगाबाद) : धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील आडगाव फाटा (ता. औरंगाबाद) येथील अंबिका हॉटेलसमोर रविवारी (ता. सहा) रात्री दहाच्या सुमारास पादचाऱ्याचा वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. गेल्या तीन दिवसांपासून मृतदेहाची ओळख न पटल्याने औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयातील शवागारात ठेवण्यात आला आहे.
रविवारी अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थांनी सदरील पादचाऱ्याला घाटीत दाखल केले असता डॉक्‍टरांनी तपासून मृत घोषित करण्यात आले.

मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले व गेल्या तीन दिवसांपासून मृतदेहाची ओळख पटत नसल्याने घाटीत शवागारात ठेवण्यात आले आहे. सदरील मृत व्यक्तीची उंची साडेपाच फूट, रंग सावळा, शरीर सडपातळ, अंगात निळ्या रंगाचा शर्ट व निळ्या रंगाची जीन्स पॅण्ट, गळ्यात तुळशीची माळ व लाल रंगाची बनियन घातलेली आहे. वरील वर्णनाच्या अनोळखी व्यक्तीचे नाव व पत्ता कोणाला मिळाल्यास त्यांनी चिकलठाणा पोलिस ठाण्याशी 0240-2484733 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. सदरील अज्ञान वाहनचालकाविरुद्ध चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलिस उपनिरीक्षक ए. जी. शिंदे, बीट जमादार एल. के. थोटे करीत आहेत.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com