नळजोडणी नसतानाही पाणीपट्टी भरण्याची नोटीस!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 ऑक्टोबर 2018

औरंगाबाद - ज्या भागात नळच नाही, त्या भागातील नागरिकांना पाणीपट्टी भरण्याच्या नोटिसा महापालिकेमार्फत बजावण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या नोटिसा बघून नागरिकही अवाक्‌ झाले आहेत.

औरंगाबाद - ज्या भागात नळच नाही, त्या भागातील नागरिकांना पाणीपट्टी भरण्याच्या नोटिसा महापालिकेमार्फत बजावण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या नोटिसा बघून नागरिकही अवाक्‌ झाले आहेत.

महापालिका प्रशासनाचे अनेक गमतीशीर किस्से वारंवार समोर येतात. त्यात आणखी एका प्रकाराची भर पडली आहे. शिवाजीनगरातील (प्लॉट क्रमांक- ५१) येथील रहिवासी रमेश जगताप यांना नळजोडणी नसतानाही थकबाकीची नोटीस देण्यात आली आहे. घरात नळच नाही, तेव्हा नोटीस कशाची, अशी विचारणा त्यांनी वॉर्ड कार्यालयात केली, मात्र त्यांना अधिकाऱ्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. त्यांनी हा प्रकार स्थायी समितीचे सभापती राजू वैद्य यांच्या कानी घातला. त्यांनी अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांच्याकडे हे प्रकरण सोपविले. नळच नाही तेव्हा नोटीस गेली कशी, याची चौकशी करण्याचे आदेश भालसिंग यांनी पाणीपुरवठा विभागाला दिले असून, संबंधितांवर कारवाईचेही आदेश दिले आहेत. शहरात पाणीपट्टीची कोट्यवधी रुपयांची थकबाकी असून, उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी असा प्रकार केला जात असल्याचे बोलले जात आहे.

Web Title: Notice for Water tax Water Connection Municipal