वीस हजारांवरील रक्‍कम काढण्यासाठी लागणार चेक 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 जून 2019

औरंगाबाद : बॅंकेतून 50 हजारांवरील रक्‍कम काढायची असल्यास ती धनादेशाने (चेक) काढावी लागत होती. या नियमात रिझर्व्ह बॅंकेने बदल केला आहे. आता 20 हजारांपुढील रक्‍कम काढायची झाल्यास ती स्लिपऐवजी चेकने काढावी लागणार आहे. 21 जूनपासून याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

डिजिटलाइजेशन चळवळ वाढीस लागावी व ग्राहकांनी या मार्गाकडे वळावे, बॅंकांमधील गर्दी कमी व्हावी या उद्देशाने रिझर्व्ह बॅंकेने परिपत्रकाद्वारे हा आदेश जारी केला होता. याची 21 जूनपासून अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले होते. यानुसार सर्व बॅंकांनी या निर्णयानुसार वीस हजारांवरील व्यवहार आता धनादेशाद्वारे करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. देशातील सर्व लीड बॅंकांना या विषयीच्या सूचनेचे पत्रही देण्यात आले आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: now cheque is must for withdrawal of more than 20 thousand