शास्त्रीय संगीताची मैफलही घरपोच, आवर्तन संगीत सभा फेसबुकवर लाईव्ह

Classical Music, Latur News
Classical Music, Latur News

लातूर : रस्त्यावर गर्दी टाळण्यासाठी किराणा दुकानातील साहित्य असो किंवा मंडईतील भाज्या सध्या घरपोच दिल्या जात आहेत. त्याप्रमाणे शास्त्रीय संगीताची एखादी मैफल घरपोच मिळाली तर...? कुठल्याही सभागृहात न जाता घरबसल्या शास्त्रीय संगीताच्या मैफलीचा आस्वाद लातूरकरांना घेता येणार आहे. यासाठी आवर्तन प्रतिष्ठानने पुढाकार घेतला आहे. ते फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून दर्दी श्रोत्यांसाठी मासिक संगीत सभा सादर करणार आहेत. शास्त्रीय संगीताचा प्रसार करण्यासाठी लातुरात प्रथमच असा प्रयोग होत आहे.

येथील आवर्तन आणि अष्टविनायक प्रतिष्ठानने अभिजात शास्त्रीय संगीताच्या प्रचारासाठी सुरू केलेल्या ‘आवर्तन मासिक संगीत सभे’ला या महिन्यामध्ये ६० महिने पूर्ण होत आहेत. म्हणजेच गेल्या पाच वर्षांपासून ही संगीत सभा अविरत सुरू आहे. अनेक दिग्गजांपासून नवोदित कलावंतांनी या सभेत सहभागी होऊन कला सादर केली आहे. पण, सध्या कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन असल्याने गर्दी टाळण्याचे आवाहन केले जात आहे. त्यामुळे आवर्तन संगीत सभेला या महिन्यात खंड पडणार, अशी चिन्हे होती. त्यावर प्रतिष्ठानने फेसबुक लाईव्हचा पर्याय पुढे आणला. शास्त्रीय संगीताच्या दर्दी श्रोत्यांना घरबसल्या संगीत मैफलीचा आस्वाद देण्याची तयारी केली आहे. ही मैफल मंगळवारी (ता. ३१) सायंकाळी ७ ते ८ या वेळेत होणार आहे. श्रोत्यांना ‘आवर्तन’च्या फेसबुक पेजवर ती अनुभवता येईल. मुंबईतील गायिका नेहा गुरव यांचे शास्त्रीय गायन होईल.

सेवा देणाऱ्यांना समर्पित
‘कोरोना’वर मात करण्यासाठी झगडणारी वैद्यकीय क्षेत्रातील मंडळी, पोलिस, बॅंक कर्मचारी, भाजी-फळे विक्रेते, घरपोच सुविधा पुरविणाऱ्या आस्थापना आदींना ही मैफल समर्पित करण्यात आली आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभय शहा, सचिव डॉ. रविराज पोरे, शशिकांत देशमुख यांनी दिली.

भाजीसाठी व्यापारी नाही राजी

अहमदपूर (जि. लातूर) : लॉक डाऊनमुळे थांबलेले व्यवहार, व्यापाऱ्यांकडून न मिळणारा प्रतिसाद आदींमुळे तालुक्यातील बहुतांश भाजीपाला उत्पादक अडचणीत सापडले आहेत. तालुक्यामध्ये भाजीपाला लागवडीचे २०२ हेक्टर क्षेत्र आहे. सहापैकी किनगाव महसूल मंडळात
सर्वांधिक तर खंडाळी मंडळात कमी भाजीपाला लागवड आहे.

शिरूरजबंद, सोरा, तांबटसांगवी, हासर्णी, उन्नी, मांडणी, तिर्थ, सोरा, तेलगाव, चोबळी, हाडोळती, माकणी, किनगाव, दगडवाडी, देवकरा, लांजी या गागांवत हिरवी मिरची, बटाटा,अद्रक, शेपू,कोथिंबीर, टोमॅटो,दोडके,फूलकोबी, पत्ता कोबी, पालक,मेथी, कांदा आदींचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. या गावांतून शहरासाठी रोद दोन लाख तर बाहेरगावी चार लाखांचा भाजीपाला जातो. सध्याच्या लॉकडाऊनमुळे व्यवहार थांबले आहेत. व्यापारी तयार झाले तर मातीमोल दराची अपेक्षा करीत आहेत. त्यामुळे भाजीपाला शेतातच पडून आहे. सुमारे चारशेवर उत्पादक आर्थिक संकटात सापडले आहेत.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com