गणेशभक्तांसाठी आता 'गो ग्रीण बाप्पा'

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जुलै 2018

निफाड : प्लास्टिकबंदी नंतर आता प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींकडे आता लक्ष वेधले गेले आहे. पर्यावरणविषयक जाणीव सर्व स्तरातून निर्माण व्हावी आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा म्हणून नुकताच 'गो ग्रीन बाप्पा' या इकोफ्रेंडली गणेश मूर्तीचे तसेच वेबसाईट व लोगोचे अनावरण महाराष्ट्राचे वित्त व नियोजन, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. प्लास्टिक असो वा प्लास्टर ऑफ पॅरिस ह्या दोन्ही पर्यावरणासाठी घातकच. प्लास्टिकबंदी प्रमाणे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती निर्मितीवर हि आता बंदी यायला हवी. गणेशोत्सव मोठ्या थाटात साजरा करण्याच्या उत्साहात पर्यावरणाची हानी होत असते.

त्यामुळे मानवी आरोग्याला धोकाही निर्माण होतो. सर्वच गणेशोत्सव मंडळ आणि घरातही पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा अशी इच्छा अनेकांची असते. पण अशावेळी त्यांना त्यातही योग्य पर्याय कोणता निवडावा? हा प्रश्न सतावतो. म्हणूनच ह्या प्रश्नावर उत्तर म्हणून सोनाली पंकज कुंभार ह्यांनी मूर्तिकार शुभम दिनेश कुंभार ह्यांच्या कलाकृतीतून 'गो ग्रीन बाप्पा' हि संकल्पना आणली आहे. नुकताच मुंबई येथील 'देवगिरी' या निवासस्थानी 'गो ग्रीन बाप्पा' या इकोफ्रेंडली गणेश मूर्तीचे तसेच प्रविण दौंड यांनी तयार केलेल्या गो ग्रीन बाप्पा च्या  www.gogreenbappa.com
वेबसाईट व लोगोचे अनावरण महाराष्ट्राचे वित्त व नियोजन, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. सर्व गणेशभक्तांनी यावर्षी आपल्या घरी "ग्रीन बाप्पा" ची प्राणप्रतिष्ठापना करून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन ह्यावेळी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

बाप्पाची मूर्ती ही लाल माती, शेणखत व कागदाच्या लगद्यापासून तयार करण्यात आली आहे. बाप्पाच्या मूर्तीसह आपणास फळभाज्यांच्या बिया देण्यात येत आहेत. बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन आपण घराच्याघरीच करून मूर्तीसह देण्यात आलेल्या बिया कुंडीत टाकून त्यातून आपणास बाप्पारूपी रोप तयार होईल. सध्या आपल्या पर्यावरणास प्लास्टर ऑफ पॅरिसचा फार मोठा धोका निर्माण होत आहे. यातूनच पर्यावरण रक्षणासाठी पर्यावरणपूरक बाप्पा ही संकल्पना निर्माण झाली. 

आपल्या सर्वांच्या सहकार्याने यावर्षीपासून "गो ग्रीन बाप्पा" हा आमचा संकल्प आहे. या संकल्पनेचे सर्व स्तरातून नक्कीच स्वागत होईल अशी अपेक्षा आहे. 
-सोनाली पंकज कुंभार 

'गो ग्रीन बाप्पा'  संकल्पनाकार गो ग्रीन बाप्पा च्या www.gogreenbappa.com ह्या वेबसाईट वर सर्व गणेशभक्तांना ऑनलाईन पद्धतीने आपला आवडता बाप्पा निवडता येईल आणि खऱ्या अर्थाने पर्यावरण रक्षणासाठी पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करता येईल.
प्रवीण दौंड 'गो ग्रीन बाप्पा' वेबसाईटचे निर्माते 

Web Title: Now for 'Ganesh Bhakt', 'Go green Bappa'