आता मराठवाड्याचा पाणी प्रश्न सोडविणार : गडकरी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 मार्च 2019

गेवराई (बीड) : औरंगाबाद ते येडशी या 190 कीलोमीटर अंतराच्या मार्गाचा लोकार्पण सोहळा होत आहे. या महामार्गाने पश्चिम महाराष्ट्र ते मराठवाडा जोडला गेल्याने महाराष्ट्राच्या विकासात भर पडेल. मराठवड्याचा रस्त्याचा प्रश्न जसा मार्गी लावला तसा येणाऱ्या काळात पाणी प्रश्न मार्गी लावू. प्रधानमंत्री सिंचाई कमल गंगा योजनेंतर्गत गोदावरीत पाणी सोडून सिंचन वाढवू असे आश्वासन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी दिले. 

औरंगाबाद - येडशी या राष्ट्रीय महामार्गासह गेवराई नगर पालिकेच्या विविध विकास कामांचे लोकार्पण शनिवारी (ता. 9) गडकरी यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नियोजित होते. मात्र, फडणवीस व गडकरी या दोघांचे दौरे ऐनवेळी रद्द झाल्यानंतर गडकरी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधून लोकार्पण झाल्याचे जाहीर केले. पालकमंत्री पंकजा मुंडे,  खासदार डॉ. प्रीतम मुंडे, संयोजक आमदार लक्ष्मण पवार, जयदत्त क्षीरसागर, सुरेश धस, भीमराव धोंडे, आर.टी. देशमुख, संगीता ठोंबरे, रमेश आडसकर, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, महामार्ग प्राधिकरणाचे गाडेकर उपस्थित होते. 

गडकरी म्हणाले,  मराठवाड्यातील सर्वच जिल्यासाठी मोठा निधी दिला.
आता उसाच्या रसापासून साखरा ऐवजी इथेनॉल तयार करा, सरकार इथेनॉल खरेदी करून पेट्रोल प्रोजेक्ट करणार आहे. त्यामुळे केल्याने कारखानादरीच्या अडचणी दूर होतील. दुष्काळी परिस्थितीत जलसिंचनाची कामे मोठ्या प्रमाणावर करण्यात येणार आहेत. मराठवाड्यातील विकास कामांत कधीच राजकीय भेदभाव केला नाही. शेतकरी समृद्ध करण्याचे सरकारचा मानस असल्याचे नितीन गडकरी म्हणाले. यावेळी पंकजा मुंडे, डॉ. प्रीतम मुंडे, लक्ष्मण पवार, जयदत्त क्षीरसागर, सुरेश धस यांची भाषणे झाली. 

पवारांच्या उमेदवारीसाठी घोषणा
दरम्यान पंकजा मुंडे यांचे भाषण सुरू असताना आमदार लक्षण पवार यांना उमेदवारी जाहीर करावी आशा घोषणा पवार समर्थकांनी दिल्या. त्यानंतर, 'तुम्ही वेडे आहात का, पवारचे तिकीट जाहीर करण्याची गरज नाही तेच उमेदवार आहेत. मी कुठे त्यांना डावलत आहे तेच लक्ष देत नाहीत, ते माझे भाऊ आहेत यामुळे बहीण भावाला धोका देत नसते' असे पंकजा मुंडे भाषणात म्हणाल्या. 

Web Title: Now i will solve water issue of marathwada