अबब...टंचाई निवारणार्थ आठ कोटींवर खर्च !

file photo
file photo

परभणी : चालू वर्षातील उन्हाळ्यात जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणार्थ तब्बल आठ कोटी २६ लाख ५३ हजार रुपयांचा खर्च झाला आहे. केवळ टॅंकर दोन कोटी ४१ लाख ७३ हजार रुपयांचा खर्च झाल्याचे पुढे आले असून तीन कोटी रुपये विहीर अधिग्रहणावर खर्च झाल्याने टंचाईची झळ किती होती? हे लक्षात येत आहे.

जिल्ह्यात सन २०१८ च्या पावसाळी हंगामात अत्यल्प पावसामुळे दुष्काळ पडला होता. त्याचा परिणाम म्हणून सन २०१९ च्या जानेवारी महिन्यापासून जिल्ह्याची भूजल पातळी कमालीची घटून शहरे आणि ग्रामीण भागात तीव्र स्वरुपाच्या पाणीटंचाईचा भडका उडाला होता. गावोगावी टंचाई सुरू झाल्याने नागरिकांचे बेहाल झाले होते. यात सन २०१९ मधील हंगामातदेखील पाऊस लांबल्याने जुले महिन्यातदेखील टंचाई सुरू होती. त्यामुळे शासनाने जुलै महिन्यात टॅंकर सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला होता.


मे महिन्याच टॅंकरची संख्या १०७ वर पोचली होती. तर विहीर अधिग्रहणाची सख्या ५०८ वर पोचली होती. दोन लाख लोकसंख्येला पाणीटंचाची झळ सहन करावी लागली. ५०० हून अधिक गावांत विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले, तर १०० गावे टॅंकरवर होती.


जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने पाणीटंचाई निवारणार्थ झालेल्या खर्चाचा ताळेबंद लावला आहे. त्यात नवीन विंधन विहिरी (कूपनलिका) १०९ गावांत घेण्यात आल्या आहेत. त्यावर ६६ लाख रुपयाचा खर्च झाला आहे. नळपाणीपुरवठा योजना दुरुस्तीची ६३ कामे करण्यात येऊन त्यावर एक कोटी ३४ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. ताप्तुरती पूरक नळ योजनेची १९ कामे करण्यात आली. त्यावर ७२ लाख रुपयांचा खर्च झाला आहे. तर १०७ टॅंकरवर दोन कोटी ४१ लाख ७३ हजार रुपयांचा खर्चा झाला आहे.५०८ खासगी विहिरींचे अधिग्रहण करून ग्रामस्थांना पाणी पुरविले होते. त्यावर सर्वाधिक तीन कोटी १२ लाख रुपयांचा खर्च झाला आहे, असा एकूण आठ कोटी २६ लाख ५३ हजार रुपयांचा खर्च टंचाईवर झाला आहे.


२०२० मध्ये टंचाईची तीव्रता अत्यल्प


यंदा उशिरा ऑक्टोबर महिन्यात सलग २० दिवस अतिवृष्टी झाली. त्यामुळे जिल्ह्यात भूजलपातळीत मोठी वाढ झाली असून नदी-नाले तुडुंब भरले आहेत. तसेच लहान-मोठे प्रकल्प, तलावदेखील काठोकाठ भरले आहेत. विहिरी, कूपनलिकांनादेखील पाणी परतले असून अनेक गावांतील विहिरी तुडुंब आहेत. जायकवाडी, येलदरी, करपरा या प्रकल्पातून सिंचनासाठी पाणी सोडले जाणार असल्याने उन्हाळ्यात लाभक्षेत्राच्या भागात टंचाईची कमी शक्यता आहे.
 

पालम, गंगाखेडला उद्‍भवू शकते टंचाई


पालम, गंगाखेड या कायम टंचाईग्रस्त भागात सिंचनाची सोय नाही. तसेच डोंगरपट्यात पाणी साठवून राहत नसल्याने पाणीपातळीतदेखील जेमतेम वाढ होते. त्यामुळे या भागात दरवर्षी टंचाई जाणवते. आगामी काळात या दोन तालुक्यांत आणि जिंतूर तालुक्यातील काही भागात टंचाईची शक्यता आहे.
......

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com