दुचाकी - कारच्या अपघातात आरोग्य सेविका ठार

आनंद इंदानी
सोमवार, 30 जुलै 2018

बदनापूर (जालना) : एका पांढऱ्या रंगाच्या कारने पाठीमागून धडक दिल्याने दुचाकीस्वार आरोग्य सेविका अलीशीबा सॅमसन शेलार (वय 35) यांचा उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना रस्त्यात मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी (ता. 30) दुपारी एक वाजेच्या सुमारास जालना - औरंगाबाद महामार्गावरील तालुक्यातील येथील देवगाव पाटीवर घडला.

मृत आरोग्य सेविका शेलार या बदनापूर पंचायत समिती अंतर्गत सोमठाणा प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत होत्या. त्यांच्याकडे धोपटेश्वर गावाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. सोमठाणा केंद्रात बैठक असल्यामुळे त्या धोपटेश्वर येथून आपल्या होंडा ऍक्टिवा दुचाकीने (क्रमांक : एम.एच.20 बी. जे. 1935) महामार्गाने जात होत्या. तेव्हा हा अपघात झाला. अपघात घडल्या नंतर कार चालक घटनास्थळावरून कारसह पळून गेला आहे, अशी माहिती पोलिस मुख्य जमादार नितीन ढिलपे यांनी दिली.

अपघाताची माहिती मिळाल्यावर बदनापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक रामेश्वर खनाळ व ढिलपे यांनी घटनास्थळाला भेट दिली. तसेच तातडीने 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला पाचारण करून उपस्थित लोकांच्या मदतीने अपघातातील जखमी श्रीमती शेलार यांना जालना येथे रुग्णालयात हलविले. मात्र डोक्याला जबर मार लागल्याने त्यांच्या नाका - कानातून रक्तस्त्राव झाल्याने दुर्दैवाने रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे बदनापूर पंचायत समिती कार्यालयात हळहळ व्यक्त करण्यात येत होती. दरम्यान, या प्रकरणी  सोमवारी (ता. 30) दुपारी चार वाजे पर्यंत कोणताच गुन्हा दाखल झालेला नव्हता.

Web Title: nurse dies in car and two wheeler accident