ओवेसींच्या सभेला लातूरमध्ये विरोध

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 मार्च 2017

लातूर - महापालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजण्याअगोदरच "एमआयएम'ने या निवडणुकीत ताकदीने उतरण्याचा निर्णय घेतला आहे. यातूनच मंगळवारी (ता. 7) पक्षाचे अध्यक्ष, खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या जाहीर सभेचे आयोजन केले आहे; पण ओवेसी यांचे अनेक ठिकाणचे वक्तव्य हे दोन समाजांत तेढ निर्माण करणारे आहे, हे कारण पुढे करीत या सभेला शिवसेना व वीरयोद्धा संघटनेने विरोध केला आहे.

"एमआयएम' व परिवर्तन विकास आघाडीच्या वतीने उद्या सायंकाळी सात वाजता टाउन हॉलच्या मैदानावर खासदार ओवेसी यांची जाहीर सभा होणार आहे. पक्षाच्या वतीने या सभेची जय्यत तयारी करण्यात येत आहे. या पक्षाचे माजी अध्यक्ष महंमद अली यांनी सोमवारी समर्थकांसह राजीनामे दिले, त्यातच हा विरोध झाल्यामुळे या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: oaisi meeting oppose in latur