ओबीसी महामंडळात 95 लाखांचा गैरव्यवहार झाल्याचे उघड

मनोज साखरे
शुक्रवार, 1 जून 2018

अस्तित्वात नसलेल्या, काल्पनिक पुरवठादारांच्या नावाने नियमबाह्य तसेच बेकायदेशिररित्या चुकीच्या पद्धतीने कर्ज वितरण केले असा संशयितांवर आरोप तक्रारीद्वारे करण्यात आला आहे.

औरंगाबाद : ओबीसी महामंडळाच्या विविध योजनेच्या कर्ज प्रकरणात अस्तित्वात नसताना, काल्पनिक पुरवठादारांच्या 
नावे नियमबाह्य, चुकीच्या पद्धतीने 95 लाखांचे कर्ज वाटप झाल्याचा प्रकार उघडकीस आला. या घोटाळ्याप्रकरणी महामंडळाचा तत्कालीन जिल्हा व्यवस्थापक आणि लेखापालविरुद्ध क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुरुवारी (ता. 31) गुन्ह्याची नोंद झाली.

जिल्हा व्यवस्थापक नागेश जगदीश देशपांडे व लेखापाल कमलेश म्हाळसाकांत भाले अशी संशयितांची नावे आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन खोकडपूरा येथील महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळात विविध कर्ज योजना उपलब्ध होत्या. 1 एप्रिल 2004 ते 31 डिसेंबर 2007 दरम्यान देशपांडे व भाले यांनी योजनेत लाभार्थ्यांना कर्ज पुरवठा केला. परंतु, कर्जपुरवठा करतेवेळी लाभार्थ्यांना कोटेशन देणारे पुरवठादार अस्तित्वात आहे की नाही याची खातरजमा केली नाही.

अस्तित्वात नसलेल्या, काल्पनिक पुरवठादारांच्या नावाने नियमबाह्य तसेच बेकायदेशिररित्या चुकीच्या पद्धतीने कर्ज वितरण केले असा संशयितांवर आरोप तक्रारीद्वारे करण्यात आला आहे.

Web Title: In the OBC institution 95 lakhs scam exposed