आरक्षण संरक्षणासाठी एकवटल्या ४६ संघटना

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 डिसेंबर 2018

लातूर - मूळ ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये, यासाठी येथे झालेल्या ओबीसी जागर मेळाव्यात विविध ४६ संघटनांचे प्रतिनिधी एकवटले. या मेळाव्यात ओबीसींच्या न्याय्य हक्कांसाठी महाराष्ट्र आरक्षण संरक्षण कृती समितीची स्थापना करण्यात आली. ओबीसी आरक्षणाला कुठलाही धक्का लागू नये, यासाठी सर्वत्र आंदोलन करण्याचा निर्णयही झाला.

ओबीसी जागर मेळावा सोमवारी (ता. दहा) रात्री झाला. ‘ओबीसीं’चा अनुशेष भरून काढल्याशिवाय महाभरती करू नये, २०११ ची जातीनिहाय जनगणना जाहीर करावी, कुणबी मराठा व उर्वरित मराठा यांची गणना एकत्रित व्हावी आदी मागण्या तत्काळ मान्य कराव्यात, यासाठी व्यापक चळवळ उभी करण्याचा निर्णय मेळाव्यात झाला. ‘ओबीसीं’च्या आरक्षणास धक्का मान्यच नाही, ‘ओबीसीं’च्या आरक्षणावरील अतिक्रमण तातडीने न थांबविल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशाराही देण्यात आला. ‘ओबीसीं’च्या मागण्यांवर वाचा फोडण्यासाठी लवकरच तालुकास्तरीय मोर्चे काढले जाणार आहेत. यापुढे प्रत्येक तालुक्‍यात समिती स्थापन करून बैठकींचे नियोजन केले जाणार आहे. मेळाव्यात प्रा. सुभाष भिंगे, राजपाल भंडे, गोपाळ बुरबुरे आदी सहभागी झाले होते.

चर्चेतील काही मुद्दे
    मूळ ओबीसींच्या आरक्षणास धक्का मान्य नाही
    कुणबी मराठा व मराठा यांची गणना एकत्रित व्हावी
    ओबीसींचा अनुशेष भरल्याशिवाय महाभरती करू नये
    ओबीसींच्या न्याय्य हक्कांसाठी मोर्चांचे नियोजन

Web Title: OBC Reservation Security