मराठा तरुणांना कर्ज वाटप करण्याचे बँकांना उद्दिष्टे : आमदार नरेंद्र पाटील

Objectives of banks to allocate debt to Maratha youth says MLA Narendra Patil
Objectives of banks to allocate debt to Maratha youth says MLA Narendra Patil

जालना : राज्यातील बँकांना मार्च अखेर 50 हजार मराठा तरुणांना कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्टे देण्यात आल्याचे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळाचे अध्यक्ष आमदार नरेंद्र पाटील यांनी शुक्रवारी (ता. 8) जालना येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

यावेळी आमदार श्री. पाटील म्हणाले की, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळाच्या माध्यमातून राज्यातील 50 हजार मराठा तरुणांना कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्टे देण्यात आले आहे. हे उद्दिष्टे राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला वाटप केले आहे. यासाठी 400 कोटींची तरदूत करण्यात आली आहे. त्यापैकी 200 कोटी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या खात्यात जमा झाले आहेत. आज जालना येथील बँकांच्या मॅनेजर यांच्यासोबत बैठक घेण्यात आली आहे. या बैठकीत जालना जिल्ह्यातील तीन हजार मराठा तरुणांना उद्योगासाठी कर्ज देण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. कर्ज मागणी केल्यानंतर तीन आठवड्यात बँकांनी ते निकाली काढणे गरजेचे आहे. बँकेच्या मॅनेजर कर्जासाठी उभा करीत नाहीत, आशा तक्रारी प्राप्त झाली आहेत, त्यावर ही चर्चा झाली असून 15 ते 20 दिवसाला जिल्ह्याधिकाऱ्यांना आढावा घेण्याच्या सूचना ही दिल्याचे यावेळी त्यांनी सांगिलते.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com