हुतात्मा शुभम मुस्तापूरे यांच्यावर अंत्यसंस्कार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 एप्रिल 2018

हुतात्मा जवान शुभम मुस्तापूरे यांचेवर आज अंत्यसंस्कार करण्यात आले.

परभणी - भारतीय लष्काराचा हुतात्मा जवान शुभम मुस्तापूरे (वय 20) यांच्यावर कोनरेवाडी (ता. पालम, जि. परभणी) येथे शासकीय इतमात अंत्यसंस्कार करण्यात आले.

राज्याचे पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्यासह प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकारी, राजकीय नेत्यासह हजारो नागरीक उपस्थित होते. शुभम मुस्तापुरे अमर रहेच्या घोषणा देण्यात येत आहेत. लष्काराचे वरिष्ठ अधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत.

Web Title: obsequies done on Martyr Shubham Mastapure