गुरुपौर्णिमेनिमित्त माहूर गडावर भाविकांची मांदीयाळी

गुरुपौर्णिमेनिमित्त माहूर गडावर भाविकांची मांदीयाळी

माहूर : माहूरगड हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. शुक्रवारी (ता.27) गुरुपौर्णिमेनिमित्त गडावर दिवसभर भाविकांची मांदीयाळी होती. हजारो भाविकांनी भगवान दत्तप्रभु व गडाचे महंत श्री मधुसुधनजी भारती महाराज यांचे दर्शन घेतले.    

माहूर गडावरील श्री दत्त शिखर संस्थान मंदिर येथे पहाटे चार वाजता गुरुपौर्णिमेनिमित्त महाआरती करण्यात आली. सकाळी साडेआठ वाजता गुरुपोर्णिमा उत्सवाच्या विधीस सुरवात करण्यात आली. श्री दत्तमंदिर मुख्य गाभारात व परिसरातील देवदेवतांचे व महंत महाराज यांच्या समाधीचे पूजन अगोदर पुजाऱ्याच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर गडाचे महंत श्री मधुसुदनजी भारती महाराज यांच्या हस्ते पुजाविधी करण्यात आला.                        .

यावेळी संस्थानचे सचिव डॉ. गणेश पाटील, विश्वस्त विश्वासराव माने, विश्वस्त धनंजय महाजन, विश्वस्त गोपाल भारती, संस्थानचे व्यवस्थापक के.व्ही. धनाड यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावर्षी संस्थानने उत्कृष्ट नियोजन केले आहे.

भाविकांच्या वाहनाकरिता स्वतंत्र वाहनतळ, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, दर्शन रागं लोखंडी तयार करण्यात आले होते. श्री दत्त शिखर संस्थान सह श्री रेणुकादेवी मंदीर, श्री अनुसया माता मंदीर, श्री देवदेवेश्वर मंदीर येथे दर्शनाकरिता भाविकांची गर्दी होती.

राज्यात आरक्षणाच्या मुद्यावरून आंदोलन सुरु असतानाही भाविकांनी दर्शनाकरिता मोठी गर्दी केली होती. पोलिस निरीक्षक लक्ष्मण राख, पोलिस उपनिरिक्षक अमोल धावारे, पोलिस उपनिरिक्षक शरद घोडके यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.                                      

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com