औंढा नागनाथ नगरपंचायतच्या प्रभाग आरक्षणाची नव्याने सोडत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

औंढा नागनाथ नगरपंचायतच्या प्रभाग आरक्षणाची नव्याने सोडत

औंढा नागनाथ नगरपंचायतच्या प्रभाग आरक्षणाची नव्याने सोडत

- दतात्रय शेगुकर

औंढा नागनाथ (जि.हिंगोली) : औंढा नागनाथ नगरपंचायत निवडणूकीसाठी गतवर्षी झालेली आरक्षण सोडत रद्द करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने दिल्या. त्यानंतर सोमवारी ता. १५ नव्याने प्रभागनिहाय आरक्षण सोडत उपविभागीय अधिकारी डाँ सचिन खल्लाळ यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

हेही वाचा: भाजपने पैसे वाटले, दंगलीचं रचलं सुनियोजित षडयंत्र - नवाब मलिक

औंढा नगरपंचायतचे आरक्षण ५० टक्केच्यावर असल्याने पुन्हा एकदा अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यासाठी राखीव झालेले आरक्षण कायम ठेवून आरक्षण सोडत कार्यक्रम प्रशासनाला घ्यावा लागला. नागरीकांचा मागास प्रवर्गातील एक जागा कमी झाली आहे.

नगरपंचायत मध्ये १७ प्रभाग असून यासाठी निवडणूक विभाग निवडणुकीची तयारी करत असून नगरपंचायत निवडणूक कार्यक्रम लवकरच लागण्याची शक्यता आहे.प्रभाग २,४,५ या प्रभागाचे आरक्षण कायम ठेवून १,३,६,७,८,९,१०,११,१२,१३,१४,१५,१६,१७ या प्रभागाचे आरक्षण सोमवारी तहसिलमधील सभागृहात सोडण्यात आले.

हेही वाचा: चित्रा वाघ यांना भाजपकडून विधानपरिषदेसाठी उमेदवारी?

नगरपंचायत १७ प्रभाग निहाय आरक्षण पुढीलप्रमाणे प्रभाग एक नामाप्र,प्रभाग तीन नामाप्र- महिला, प्रभाग सहा,सात , सर्वसाधारण महिला,प्रभाग आठ, नऊ,सर्वसाधारण, प्रभाग १० नामाप्र महिला, प्रभाग ११,१२ सर्वसाधारण महिला ,प्रभाग १३,१४ सर्वसाधारण,प्रभाग १५ नामाप्र,प्रभाग १६ सर्वसाधारण महिला ,प्रभाग १७ सर्वसाधारण याप्रमाणे आरक्षण सोडत झाली आहे.

या आरक्षण सोडतीला नायब तहसीलदार सचिन जोशी, मुख्याधीकारी सचिन जयस्वाल, पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे, व्यासपीठावर होते .यावेळी औंढा नागनाथ येथील राजकीय पुढारी, ग्रामस्थ या आरक्षण सोडतीला उपस्थित होते . या आरक्षण सोडतीसाठी अविनाश चव्हाण, महादेव बळवंते, विजय महामुने ,अनिल नागरे,सचिन वसमतकर, मंजुषा जाधव, राधा काळे, नलिनी मलमवार, सुभाष लांडगे, विष्णू रणखांबे ,नंदा अंभोरे ,नागेश बुरकुले ,सतीश रणखांबे या कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला. हे आरक्षण चिठ्ठी द्वारे काढण्यात आहे.ह्या चिठ्ठ्या पुजा पायघन,दुर्गा पायघन या मुलीच्या हाताने काढण्यात आल्या. यावेळी पोलिस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक आनिल लांडगे, जमादार संदीप टाक, गजानन गिरी ,आमोल चव्हाण,प्रवीण गायकवाड ,यश आडे, लक्ष्मण दिघाडे यांनी कडक बंदोबस्त दिला होता.

loading image
go to top