रासप नेते रत्नाकर गुट्टे विरोधात गुन्हा; पत्नीनेच दिली फिर्याद

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 12 जानेवारी 2019

गंगाखेड येथील गंगाखेड शुगर फॅक्टरीचे चेअरमन व उद्योजक तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते रत्नाकर गुट्टे यांच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. शारीरिक, मानसिक छळ करत असल्याची फिर्याद पत्नी सुदामती गुट्टे यांनी दिल्यावरुन त्यांच्यासह इतर सात जणांविरोधात गुन्हा नोंद झाला आहे.

परळी वैजनाथ : गंगाखेड येथील गंगाखेड शुगर फॅक्टरीचे चेअरमन व उद्योजक तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते रत्नाकर गुट्टे यांच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. शारीरिक, मानसिक छळ करत असल्याची फिर्याद पत्नी सुदामती गुट्टे यांनी दिल्यावरुन त्यांच्यासह इतर सात जणांविरोधात गुन्हा नोंद झाला आहे.

रत्नाकर गुट्टे मागील काही दिवसांपासून घटस्फोट मागत आहेत, तसेच मद्यपान करुन शिव्या व इतर आरोपही पत्नी सुदामती गुट्टे यांनी फिर्यादीत नमूद केले आहेत. रात्री-अपरात्री परस्त्रीयांना घरी घेऊन येतात, मला घराबाहेर काढण्याची धमकी देत ‘तू मला पसंत नाही,’ असं म्हणून दाबदडप करतात. दीरासह नवरा आणि अन्य आपल्याला पिस्तुलाचा धाक दाखवून तुला मारुन टाकू अशी धमकी देतात यासह अन्य गंभीर स्वरुपाची लेखी तक्रार पोलिसात दिलेली आहे. त्यांच्या छळाला इतरांचे पाठबळ असल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. यावरुन रत्नाकर गुट्टे यांच्या छळाला त्यांच्यासह इतरांचे पाठबळ असल्याचेही नमूद केल्यावरुन रत्नाकर गुट्टे, अंकुश गुट्टे, सुंदराबाई गुट्टे, कल्पना गुट्टे, सिताबाई, मुंडे, विष्णू मुंडे, संजय मुंडे आदींवर शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा नोंद झाला.

दरम्यान, गेल्या दोन महिन्यांपूर्वीच रत्नाकर गुट्टे हे शेतकर्‍यांच्या नावावर पैसे उचलल्याच्या कारणावरून गुन्हा नोंद झाल्याने अडचणीत आले होते. 

Web Title: Offense against RSP leader Ratnakar Gutte