या कारणामुळे यूट्यूब व्यवस्थापन, अपलोडरवर गुन्हा 

file photo
file photo

औरंगाबाद - मुंबईत प्रदर्शित झालेला व उर्वरित महाराष्ट्‍ररात प्रदर्शित होण्याआधीच एका अपलोडरने 'मेनका उर्वशी' हा चित्रपट यूट्यूबवर अपलोड केला. यामुळे देवयानी प्रॉडक्‍शनचे मछिंद्र चाटे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. यात औरंगाबादच्या मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात अपलोडर आणि यूट्यूब व्यवस्थापनाविरुद्ध कॉपीराईट कायद्यानुसार गुन्ह्याची नोंद झाली. 

चाटे कोचिंग क्‍लासेसचे मछिंद्र चाटे यांचे देवयानी मुव्हीज प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी आहे. चित्रपट निर्मिती, दिग्दर्शन क्षेत्रात बावीस वर्षांपासून कार्यरत आहेत. कंपनीचे मुख्य कार्यालय औरंगाबादेत असून चाटे यांनी मुकुंदवाडी ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार

त्यांचा नवीन चित्रपट मेनका उर्वशी हा जुलै 2017 ते एप्रिल 2018 या कालावधीत पूर्ण झाला व 15 मार्च 2019 ला मुंबईत प्रदर्शित करण्यात आला. उर्वरित महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित करणे बाकी आहे. असे असतानाही  5 जून 2019 ला समीर मनोज वैती या व्यक्तीने चित्रपटाच्या मुळ प्रमाणपत्रासह संपूर्ण चित्रपट चाटे यांची कोणतीही परवानगी न घेता यूट्यूब वेबसाइटवर अपलोड करून प्रदर्शित केला. ही बाब चाटे यांना समजली. त्यानंतर त्यांनी यूट्यूब व्यवस्थापनाने चित्रपट प्रदर्शित करू नये म्हणून 2 ऑगस्टला यूट्यूब चॅनेलवर फ्लॅग देऊन चित्रपट प्रदर्शित न करण्याबाबत विनंती केली होती. तसेच टेक डाउन नोटिस देऊन स्ट्राईक दिली. तरीही चित्रपटाचा व्हिडिओ यूट्यूबवर उपलब्ध आहे.

मूळ प्रमाणपत्रासह डाटा चोरून चित्रपट अपलोड करणारी व्यक्ती समीर वैती व यूट्यूब व्यवस्थापनाविरुद्ध त्यांच्या तक्रारीनुसार कॉपीराईट कायद्यानुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली. अशी माहिती तपास अधिकारी व वरिष्ठ पोलिस निरीक्षक उद्धव जाधव यांनी दिली.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com