महापुरुषांबाबत FB वर आक्षेपार्ह पोस्ट; लातुरात दगडफेक, तणाव कायम

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जुलै 2019

फेसबुकवर प्रेम कदम नावाच्या एका तरुणाने छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल शनिवारी अश्लील अशी आक्षेपार्ह पोस्ट टाकली. या पोस्टमधून टाकलेल्या चित्रांमुळे लातूर शहरात वेगाने तणाव निर्माण झाला.

लातूर : फेसबुकवर प्रेम कदम नावाच्या एका तरुणाने छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल शनिवारी अश्लील अशी आक्षेपार्ह पोस्ट टाकली. या पोस्टमधून टाकलेल्या चित्रांमुळे लातूर शहरात वेगाने तणाव निर्माण झाला.

विवेकानंद चौकात एका बसवर दगडफेकही झाली. पोलिसांनी वेळीच खबरदारी घेत प्रेम कदम आणि त्याच्या इतर चार मित्रांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या म्हणण्यासुर प्रेम कदम याचे फेसबुक अकॉउंट हॅक करून त्याच्या मित्रांनीच ही पोस्ट टाकत प्रेमवर सूड उगवण्याचा प्रयत्न केला आहे. 

ही पोस्ट फेसबुकवर टाकण्यात आल्यानंतर तरुणांमध्ये संताप निर्माण झाला आणि दुपारी तरुणांचे गट रस्त्यावर उतरले. मात्र, तोपर्यंत पोलिसांनी संशयित आरोपींना ताब्यात घेतल्याने शांतता राखण्यात यश मिळाले. पोलिस आता या घटनेची कसून चौकशी करीत असून, शहरातील मुख्य रस्त्यांवर खबरदारी म्हणून पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Offensive posts on FB about Dr Ambedkar and Shivaji Maharaj