उपविभागीय अधिकाऱ्यांसह चौघांना वाळूमाफियांनी कोंडले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 मे 2018

बीड - विटभट्टीतील अवैध वाळूसाठ्यावर कारवाई करण्यास गेलेल्या उपविभागीय अधिकारी विकास माने यांच्यासह चार अधिकाऱ्यांना कोंडून वाहनांसह तीन वाळूमाफीया फरार झाल्याची घटना शनिवारी (ता. 12) औरंगपूर येथे घडली. पोलिसांच्या मदतीने महसूल अधिकाऱ्यांनी पाऊण कोटींचा वाळूसाठा जप्त केला.

कुर्ला, औरंगपूर गावाजवळील सिंदफणा नदीतून वाळूउपसा होत असल्याने उपविभागीय अधिकारी विकास माने, खनिकर्म अधिकारी आनंद पाटील, मंडळ अधिकारी पी. के. राख, तलाठी आसाराम शेळके हे चौघे वाळू घाटांची पाहणी करण्यासाठी औरंगपूरला गेले. तेथील यशराज विटभट्टी कारखान्यात त्यांना वाळूचा मोठा साठा आढळला. अधिकाऱ्यांनी कारखान्यात जाऊन वाळूच्या रॉयल्टीच्या पावत्या मागितल्यानंतर तेथील लोकांनी पावत्या नसल्याचे सांगितले. त्यामुळे अधिकाऱ्यांनी कारवाईची भूमिका घेताच अनिल पांडुरंग पाटील याने सहकाऱ्यांना विटभट्टीचे प्रवेशद्वार बंद करायला लावले. दरम्यान, माने यांनी सहायक अभियंता व्ही. टी. डहाळे यांच्या मदतीने वाळूचे मोजमाप घ्यायला सुरवात केली. या वेळी तब्बल पाऊण कोटी रुपयांचा 314 ब्रास वाळूचा साठा आढळून आला.

Web Title: officer clutter by sand mafia crime