अधिकारी असो वा पदाधिकारी; वन्यजीव कायदा पाहून कार्यवाही

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 जानेवारी 2017

औरंगाबाद - सिद्धार्थ प्राणीसंग्रहालयातील समृद्धी या वाघिणीच्या बछड्यांना हाताळल्याप्रकरणी वन्यजीव कायदा काय सांगतो हे पाहुनच कार्यवाही केली जाईल. अधिकारी असो अथवा पदाधिकारी कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई होईल असे महापालिका आयुक्‍त ओम प्रकाश बकोरीया यांनी सांगीतले.

प्राणीसंग्रहालयात गुरुवारी (ता.12) पिवळी वाघिण समृद्धीच्या बछड्यांच्या नामकरणप्रसंगी या दोन्ही पदाधिकाऱ्यांनी त्या बछड्यांवरून फिरवलेला हात शुक्रवारी (ता.13) चर्चेचा विषय झाला. यावरून सकाळीच आयुक्‍तांनी प्राणीसंग्रहालय व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांना बोलावून याविषयी माहिती मागीतली. यानंतर आयुक्‍तांनी पत्रकारांना सांगीतले की, बछड्यांना केअरटेकर व डॉक्‍टरांशिवाय अन्य कोणी स्पर्श करू नये यासाठी ठराविक काळापर्यंत त्यांच्या पिंजऱ्याजवळ इतरांना जाऊ दिले नव्हते. नंतर त्यांची छायाचित्रे काढण्याची परवानगी दिली होती. आता बछडे दोन अडीच महिन्यांचे झाले आहेत, वन्य जीव कायद्यातील तरतूदीत काय म्हटले आहे याची तपासणी करून योग्य ती कार्यवाही केली जाईल असे स्पष्ट केले.

कौतुकाने हात लावला - मेघावाले
महापौर भगवान घडामोडे व स्थायी समिती सभापती मोहन मेघावाले यांनी याविषयी प्रतिक्रिया व्यक्‍त करताना सांगीतले की, दोन- अडीच महिन्यांचे बछडे पिंजराभर धावत होते, त्याचे कौतूक वाटले म्हणून आम्ही कौतुकाने बछड्यांना हात लावला. वन्यजीव कायद्याचा भंग करणे किंवा त्यांना त्रास होईल असे वर्तन करणे आमचा उद्देश नसल्याचे स्पष्ट केले.

Web Title: officer crime by omprakash bakoria