नागरिकांच्या शाळेत अधिकाऱ्यांना शिक्षा!

aurangabad.jpg
aurangabad.jpg

औरंगाबाद : गेल्या वर्षभरापासून दूषित पाण्याची तक्रार करूनही कामे होत नसल्यामुळे संतप्त नगरसेविका आणि नागरिकांनी महापालिका अधिकाऱ्यांना कोंडल्याचा प्रकार शुक्रवारी (ता. 19) सकाळी न्यू हनुमाननगर येथील गल्ली क्रमांक एकमध्ये घडला. 

पुंडलीकनगर वॉर्डाच्या नगरसेविका मीना गायके यांनी गुरुवारी (ता. 18) झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नळाला येणाऱ्या दूषित पाण्याच्या बाटल्या आयुक्त डॉ. निपुण विनायक यांना भेट दिल्या होत्या. आयुक्तांनी देखील नागरिकांना दूषित पाणी मिळत असेल तर शरमेची बाब आहे, असे सांगत दुरुस्तीची कामे तातडीने करण्याचे आश्‍वासन दिले होते.

सकाळी 11 वाजेच्या सुमारास महापौर नंदकुमार घोडेले यांच्यासह अधिकारी पाहणी करण्यासाठी गेले. महापौरांनी बंद पडलेले ड्रेनेजलाईनचे काम सुरू करण्याची कंत्राटदाराला सूचना करत तेथून काढता पाय घेतला. त्यानंतर पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता के. एम. फालक, ड्रेनेजचे पी. पवार यांच्यासह अधिकारी पाहणी करत असताना नगरसेविकेचा मुलगा विशाल गायके यांच्यासह नागरिक, महिलांनी अधिकाऱ्यांना एका दुकानात बसवून ठेवले. स्वतः आयुक्त आल्याशिवाय तुमची सुटका नाही, असा पवित्रा घेत अधिकाऱ्यांवर प्रश्‍नांचा भडिमार करण्यात आला. अधिकाऱ्यांनी आयुक्त, महापौरांसोबत फोनवरून संपर्क साधत घडला प्रकार कानावर टाकला.

आयुक्तांनी आता काम सुरू झाल्यानंतर अधिकाऱ्यांना वेठीस धरणे चुकीचे आहे, असे नमूद केले. मात्र नागरिकांची मागणी कायम आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com