हिंगोलीत भरती घोटाळ्याच्या तपासासाठी अधिकार्‍यांचे पथक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 मे 2018

येथील राज्य राखीव दलाच्या भरतीमध्ये लेखी परीक्षेत घोटाळा उघडकीस आला आहे. वीस उमेदवारांच्या उत्तरपत्रिकांमध्ये गुण वाढवण्यात आल्याचे स्पष्ट झाली आहे.

हिंगोली - येथील राज्य राखीव दलाच्या भरती घोटाळा प्रकरणात तपासासाठी पोलिस उपअधीक्षकांसह चार अधिकाऱ्यांचे स्वतंत्र पथक स्थापन करण्यात आले आहे. या पथकामार्फत या प्रकरणाचा सखोल तपास केला जाणार असल्याचे पोलिस विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

येथील राज्य राखीव दलाच्या भरतीमध्ये लेखी परीक्षेत घोटाळा उघडकीस आला आहे. वीस उमेदवारांच्या उत्तरपत्रिकांमध्ये गुण वाढवण्यात आल्याचे स्पष्ट झाली आहे. त्यावरून शहर पोलिस ठाण्यात तत्कालीन समादेशक जयराम फुफाटे यांच्यासह 26 जणांवर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया अप्पर पोलिस अधीक्षक सचिन गुंजाळ उपाधीक्षक राहुल मदने पोलिस निरीक्षक अशोक मैराळ यांची शनिवारी (ता. 12) रात्री उशिरा बैठक झाली. या बैठकीमध्ये भरती घोटाळ्याच्या तपासासाठी स्वतंत्र पथक स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आहे. 

या पथकामध्ये पोलिस उपअधीक्षक राहुल मदने, पोलिस निरीक्षक अशोक मैराळ, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक विनायक लंबे, पोलिस उपनिरीक्षक प्रकाश आवचार यांचा समावेश आहे. या पथकाकडून या प्रकरणाचा तपास केला जाणार असून तपासातील दररोज होणारी प्रगती वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविली जाणार आहे. सध्या राखीव दलात असलेल्या निलंबित जवानांना ताब्यात घेण्याची तयारी या पथकाने सुरू केल्याचे पोलिस विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Officials team to check recruitment scam in Hingoli

टॅग्स