ऑईलमिलमध्ये स्फोटात परळी तालुक्यात एक ठार तर दोघे गंभीर

प्रा. प्रवीण फुटके
रविवार, 17 फेब्रुवारी 2019

येथील ग्रामीण पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, परळी बीड राज्य रस्त्यावरील तळेगांव येथील गजानन एक्सट्रसन लिमिटेड ही बंद ऑईलमिल या कंपनीत रविवारी (ता. 17) सकाळी 9:30 वाजता अचानक स्फोट झाला. या स्फोटाचा आवाज जवळपास तीन किलोमीटर पर्यंत आला.

परळी वैजनाथ (जि. बीड) : तालुक्यातील तळेगाव येथील बंद ऑईलमील मध्ये स्फोट होऊन झालेल्या अपघातात एक जण ठार तर दोघे जखमी झाल्याची घटना रविवारी (ता. 17) सकाळी घडली. स्फोट कशामुळे झाला याबद्दल संदिग्धता आहे.

येथील ग्रामीण पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, परळी बीड राज्य रस्त्यावरील तळेगांव येथील गजानन एक्सट्रसन लिमिटेड ही बंद ऑईलमिल या कंपनीत रविवारी (ता. 17) सकाळी 9:30 वाजता अचानक स्फोट झाला. या स्फोटाचा आवाज जवळपास तीन किलोमीटर पर्यंत आला. परिसरातील लोकांमध्ये घबराट निर्माण झाली. या स्फोटात तीघेजण गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान गोपाळ गनगे यांचा मृत्यू तर ज्ञानोबा लुंगेकर (वय 40) व गोपाळ घोटाळ (वय 38) दोन जखमींनाआंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश चाटे व त्यांचे तपासणी पथक दाखल झाले आहे. दरम्यान ही ऑईलमिल मागील दोन वर्षांपासून बंद आहे. या ऑईलमध्ये या अगोदरही अशा स्वरूपाच्या दोन घटने मध्ये चार लोकांचा मृत्यू झाला होता. स्फोटाचे कारण मात्र कळू शकले नाही.

Web Title: In the oil field one killed in Parli taluka and two serious