गेवराईत मोटारीमधून साडेनऊ लाख जप्त

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 फेब्रुवारी 2017

जुन्या हजार, पाचशेच्या नोटांचा समावेश
बीड - शेवगावहून गेवराई मार्गे औरंगाबादकडे जाणाऱ्या मोटारीमधून साडेनऊ लाख रुपये जप्त करण्यात आले. यात चलनातून बाद झालेल्या एक हजार व पाचशे रुपयांच्या नोटांचा समावेश आहे. गेवराई पोलिसांनी शुक्रवारी (ता. 24) रात्री उशिरा चकलांबा फाट्यावर ही कारवाई केली. याप्रकरणी जमीर जलील खान (रा. नारेगाव, औरंगाबाद) या संशयितास पोलिसांनी अटक केली.

मोटारीत (एमएच - 21 व्ही - 7802) नोटा असल्याची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक दिलीप तेजनकर यांनी सहकाऱ्यांसह सापळा रचला व मोटार अडवली. त्या वेळी जुन्या एक हजार रुपयांच्या नोटांचा समावेश असलेले पाच लाख, पाचशेच्या नोटांचा समावेश असलेले साडेचार लाख रुपये आढळले. चकलांबा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून, नोटांसह गाडी जप्त केली आहे. नोटा कुठून, कशासाठी नेल्या जात होत्या यासंदर्भात पोलिस संशयित जमीर खानची चौकशी करीत आहेत.

Web Title: old currency seized

टॅग्स