वृद्ध महिलेचा दिवसा गळा चिरून खून 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 जानेवारी 2019

बीड - शहरातील अयोध्यानगर भागात एका वृद्ध महिलेचा शनिवारी (ता. 19) सकाळी अज्ञात व्यक्तीने गळा चिरून खून केला. दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकारामुळे अयोध्यानगरात भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी घटनेचा पंचनाम करत शोधाशोध केली असता घराच्या परिसरातील कोरड्या विहिरीत गळा चिरण्यासाठी वापरलेली बतई सापडली. 

अयोध्यानगर येथील शीलावती किसन गिरी (वय 60) या शनिवारी सकाळी घरकाम करत होत्या. त्यांचे पती भिक्षा मागण्यासाठी बाहेर गेले होते. सकाळी साडेदहाच्या सुमारास त्यांच्या घरात अज्ञात व्यक्तीने प्रवेश करत घरातीलच कांदा कापायच्या बतईने त्यांचा गळा चिरून खून केला. ही घटना काही वेळात परिसरातील नागरिकांना समजल्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती पेठ बीड पोलिसांना दिली. यानंतर लगेच पेठ बीड पोलिसांसह पोलिस उपअधीक्षक सुधीर खिरडकर यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला. पोलिसांनी परिसरात झाडाझडती घेतली असता, घराच्या परिसरातील कोरड्या विहिरीत खुनात वापरलेली बतई सापडली. या सर्व परिस्थितीच्या अनुषंगाने पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. 

दत्तक घेतलेला मुलगा ऊसतोडणीला 
अयोध्यानगरात राहणाऱ्या शीलावती गिरी यांना मूलबाळ नव्हते म्हणून त्यांनी एक मुलगा दत्तक घेतला. सध्या हा मुलगा ऊसतोडणीसाठी बाहेर गेल्यामुले दोघे नवरा-बायको भिक्षा मागून उदरनिर्वाह करीत होते.

Web Title: old woman chopped murder in beed