दानपेटीजवळ दिड महिन्याच्या बालकाला सोडून महिला गायब

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 डिसेंबर 2018

शहरातील वैद्यनाथ मंदिर परिसरातील पायथ्याशी असलेल्या शनिमंदिर येथे दानपेटी जवळ एक दिड महिन्याचे बालक सोडून महिला फरार झाली आहे.
 

परळी वैजनाथ(बीड)- शहरातील वैद्यनाथ मंदिर परिसरातील पायथ्याशी असलेल्या शनिमंदिर येथे दानपेटी जवळ एक दिड महिन्याचे बालक सोडून महिला फरार झाली आहे.

येथे वैद्यनाथ मंदिर परिसरातील शनिमंदिर येथे दानपेटी जवळ रविवारी (ता.02) रात्री दहाच्या सुमारास एका अनोळखी महिलेने आपले एक ते दिड महिन्याचे पुरुष जातीचे बालक एका पिशवीत आणून ठेवले यावेळी मंदिरातील वाचमन जेवण करण्यासाठी घराकडे गेला होता मंदिरात कोणीनाही याचा फायदा घेत महिला फरार झाली.

वाचमन मंदिरात येताच त्याने नेहमी प्रमाणे सर्वत्र पाहिले. तर दानपेटीजवळ पिशवी दिसली इकडे तिकडे पाहिले कोणीच दिसले नाही म्हणून पिशवी पाहिली असता त्या बालकाने हातपाय हालवले. तात्काळ, मंदिर प्रशासनास कळवले. त्यांनी डिबी प्रमुख समाधान भाजीभाकरे यांच्याशी संपर्क साधला. इतरवेळी पोलिस वेळेवर येत नाहीत पण भाजीभाकरे यांनी तत्परतेने अवघ्या पाच मिनिटांत घटनास्थळी धाव घेतली व या बालकाला ताब्यात घेतले.

लगेच, येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचारानंतर सोमवारी (ता.03) सकाळी आंबेजोगाई येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान, पोलिस प्रशासनाने वैद्यनाथ मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेरे पाहिले असता एक महिला दिसून आली पण तिची ओळख अद्याप पर्यंत पटलेली नाही.

Web Title: one and Half month chilld left near temple Donation Box