धरीला आळंदीचा चोर! 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017

औरंगाबाद - बालपणापासून आळंदीस शिक्षणासाठी गेलो, तेथेच शिक्षण घेतले व मृदंगही शिकलो. पण आता दुर्बुद्धी सुचली अन्‌ खंडणीच्या प्रकरणात अडकलो. पण आता पोलिसांनीच आपला मृदंग वाजवला, अशी बाब हताशपणे नागेश्‍वरने सांगितली. 

औरंगाबाद - बालपणापासून आळंदीस शिक्षणासाठी गेलो, तेथेच शिक्षण घेतले व मृदंगही शिकलो. पण आता दुर्बुद्धी सुचली अन्‌ खंडणीच्या प्रकरणात अडकलो. पण आता पोलिसांनीच आपला मृदंग वाजवला, अशी बाब हताशपणे नागेश्‍वरने सांगितली. 

नागेश्‍वर चव्हाण बालपणापासूनच भजनी मंडळात सहभागी होत असे. यातून त्याच्या पालकांनी त्याला आळंदीला शिक्षणासाठी पाठवले. तेथे त्याने सांगितीक व शालेय शिक्षण घेतले. त्यानंतर तो शहरात आला. वाळूज भागात अनेक कीर्तनांत त्याने मृदंग वाजवला. पण रोजगारही महत्त्वाचा होता, म्हणून तो एका कंपनीत काम करू लागला. त्रोटक पगारामुळे घरखर्च भागविणे कठीण झाले होते. विष्णूसोबत त्याची ओळख होतीच. तोही एका कंपनीत काम करीत असल्याने चांगली मैत्रीही झाली. झटपट पैशांच्या नादी विष्णू लागला होता. यातून त्याला दुर्बुद्धी सुचली अन्‌ नागेश्‍वरही विष्णूच्या नादाला लागला. 

वर्तमानपत्रात विष्णूचे नाव आल्याने आम्ही निश्‍चिंत राहिलो. पण पोलिसांनी आमचा माग काढलाच, हताश भावना व शांत केविलवाणी चेहऱ्याने नागेश्‍वर आपल्या कृत्याची कबुली देत आपला पट सांगत होता. खंडणीसाठी मी विष्णूसोबत होतो, मी डॉक्‍टरला धमकावले नाही, असेही त्याने सांगितले. 

...असा लागला तपास 
विष्णू, नागेश्‍वर व अर्जुनच्या त्या दिवशी जाण्या-येण्याच्या मार्गावरील सुरू असलेले व नागरिकांनी वैयक्तिक पातळीवर लावलेले सीसीटीव्ही पोलिसांनी तपासले. एकूण 50 सीसीटीव्हीतील केवळ पाच सीसीटीव्हीत ते कैद झाले होते. ते फुटेज हस्तगत करून पोलिसांनी स्क्रीन शॉट काढले, रेखाचित्र तयार केले. शस्त्र कायद्याखाली कारवाई झालेले सुमारे दोनशे अट्टल व रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासले. पण शोध लागत नव्हता. खंडणी मागणाऱ्यांकडे पिस्तूल असल्याने पोलिसांनी हे प्रकरण गंभीर घेतले. 

संशयितांनी वापरलेल्या दुचाकीचा पोलिसांनी फुटेजद्वारे क्रमांक मिळवला. दुचाकीची माहिती घेतली असता, ती फेब्रुवारी 2015 ला खरेदी केल्याचे समोर आले. पोलिसांनी शहरातील चार मोठ्या शो रूममधून माहिती मिळवली. वाळूज येथून दुचाकी खरेदी केल्याचे स्पष्ट होऊन ती नागेश्‍वर चव्हाणची असल्याचे उघड झाले. त्यावरून पोलिसांनी तिघे एकत्र येण्याची वाट पाहिली, पण मुख्य सूत्रधार पसार झाल्याने दोघांना शेवटी अटक केली. 

Web Title: one arrested